कुख्यात गुंड पिस्तुलासह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST2021-03-04T04:10:59+5:302021-03-04T04:10:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमार यासह २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एका अट्टल ...

Arrested with notorious hooligan pistol | कुख्यात गुंड पिस्तुलासह जेरबंद

कुख्यात गुंड पिस्तुलासह जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमार यासह २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला तहसील पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूसही जप्त करण्यात आले आहे.

तहसील पोलिसांनी सोमवारी रात्री ही कारवाई केली. इब्राहीम ऊर्फ छोटा नबी खान (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. तो बोरियापुऱ्यात राहतो. या संबंधीची माहिती देताना तहसीलचे ठाणेदार जयेश भांडारकर यांनी सांगितले की, इब्राहीम खान हा अट्टल गुन्हेगार आहे. २०१७ मध्ये एका हत्याकांडासह त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सोमवारी तहसील पोलीस बोरियापुरा भागात गस्त करीत असताना आरोपी खान त्यांना संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलीस आपल्याकडे येताना पाहून तो पळू लागला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले. तपासणीत त्याच्याजवळ पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा ३१ हजारांचा मुद्देमाल आढळला. त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक जयेश भांडारकर, द्वितीय पोलीस निरीक्षक बलिरामसिंग परदेसी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील वाघ, हवलदार लक्ष्मण शेंडे, समीर शेख, शैलेश दोबोले आदींनी बजावली.

---

गुन्हा करण्याच्या तयारीत?

आरोपी खान हा अट्टल गुन्हेगार असल्याने तो पिस्तूल घेऊन गुन्हा करण्याच्या तयारीत असावा, असा संशय आहे. तो नेमका कोणता गुन्हा करण्याच्या तयारीत होता, त्याने पिस्तूल कुणाकडून आणले, त्याची माहिती घेतली जात असल्याचे भांडारकर यांनी सांगितले.

---

Web Title: Arrested with notorious hooligan pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.