खुनातील आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:09 IST2021-04-02T04:09:06+5:302021-04-02T04:09:06+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : चाकूने भाेसकून तरुणाची हत्या केल्याची घटना काटाेल शहरात बुधवारी (दि. ३१) दुपारी घडली हाेती. ...

Arrested in murder case | खुनातील आराेपी अटकेत

खुनातील आराेपी अटकेत

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : चाकूने भाेसकून तरुणाची हत्या केल्याची घटना काटाेल शहरात बुधवारी (दि. ३१) दुपारी घडली हाेती. हत्येनंतर पळून गेलेल्या आराेपींना काटाेल पाेलिसांनी गुरुवारी (दि. १) सायंकाळी रिधाेरा परिसरात अटक केली.

नितेश ऊर्फ गिरीश लीलाधर गजबे (२१, रा. अर्जुननगर, काटाेल) असे मृत तरुणाचे, तर करण गवळी व अर्जुन माटे (दोघेही रा. काटाेल) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. करण व नितेश यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू हाेता. हाच वाद विकाेपास गेला आणि करणने अर्जुनला साेबत घेऊन बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नकतेशसाेबत भांडायला सुरुवात केली. त्यातच या दाेघांनी नितेशवर चाकूने वार केल्याने ताे गंभीर जखमी झाला.

नागरिकांनी त्याला लगेच शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले, तर आराेपींनी लगेच घटनास्थळाहून पळ काढला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपींचा शाेध सुरू केला. दरम्यान, आराेपी त्यांच्याकडे असलेली माेटरसायकल परत करण्यासाठी कुहीहून रिधाेरा (ता. काटाेल) येथे येत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यामुळे पाेलिसांनी या भागात पाळत ठेवली. आराेपी दिसताच त्यांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

Web Title: Arrested in murder case