शस्त्र बाळगणारा आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:09 IST2021-03-08T04:09:33+5:302021-03-08T04:09:33+5:30
कामठी : शहरातील शुक्रवारी बाजारात हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला पाेलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ...

शस्त्र बाळगणारा आराेपी अटकेत
कामठी : शहरातील शुक्रवारी बाजारात हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला पाेलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ६) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
विनय रामलाल मेश्राम (१९, रा. करुणा बुद्धविहाराजवळ, हमालपुरा, कामठी) असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. ताे हातात चाकू घेऊन शहरातील शुक्रवारी बाजारात फिरत हाेता. त्याने बाजारातील एका हार्डवेअर दुकानासमाेर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांनी लगेच पाेलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. पाेलिसांना पाहताच त्याने पळ काढला, मात्र पाेलिसांनी पाठलाग करून त्याला त्यात अटक केली व चाकू जप्त केला. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई तंगराज पिल्ले, गयाप्रसाद वर्मा, महेश कठाणे, ईशांत कांबळे, पंकज मारशिंदे यांच्या पथकाने केली.