अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:29+5:302021-05-30T04:08:29+5:30
टाकळघाट : घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा आराेपीने विनयभंग केला. ही घटना बुटीबाेरी एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बीड गणेशपूर येथे ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आराेपीस अटक
टाकळघाट : घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा आराेपीने विनयभंग केला. ही घटना बुटीबाेरी एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बीड गणेशपूर येथे गुरुवारी (दि.२७) उघडकीस आली. दरम्यान पीडित मुलीच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.
सागर सीताराम उईके (२०, रा. बीड गणेशपूर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. गुरुवारी (दि.२७) पीडित १३ वर्षीय मुलगी घरी एकटीच असताना आराेपीने मुलीच्या काेंबड्यांनी अंगणात घाण केली म्हणून तिला साफ करण्यासाठी राहुल नामक मुलामार्फत बाेलावून घेतले. दरम्यान, पीडित मुलगी आराेपीच्या अंगणातील घाण साफ करण्यासाठी गेली असता, आराेपीने तिचा हात पकडून तिला घरात ओढण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरड करताच शेजारी राहुल मदतीला धावून आल्याने आराेपीने तिचा हात साेडला. रात्री आईवडील घरी आल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार पीडितेसह तिच्या आईवडिलांनी पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली.
याप्रकरणी बुटीबाेरी एमआयडीसी पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३४५, ३४५ (अ), सहकलम ८ पाेक्साे अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीस अटक केली आहे. पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक पल्लवी काकडे करीत आहेत.