अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:56+5:302021-02-06T04:12:56+5:30
कुही : अल्पवयीन मुलीची छेड काढत आराेपीने तिचा विनयभंग केला. दरम्यान, पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्याला अटक केली. ही ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आराेपीस अटक
कुही : अल्पवयीन मुलीची छेड काढत आराेपीने तिचा विनयभंग केला. दरम्यान, पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्याला अटक केली. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भामेवाडा येथे साेमवारी (दि.१) उघडकीस आली.
महेश राजू ईखारकर (२२, रा. भामेवाडा, ता. कुही) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी अंगणात वाळविण्यासाठी टाकलेले कपडे काढण्यासाठी आली असता, आराेपीने तेथे येऊन ‘तू कितवीला आहे’ असे विचारत तिची छेड काढली. मुलीने बारावीला सांगितले असता, आराेपीने तिला इंग्रजीचे पुस्तक मागितले. अशात आराेपीने तिला चिठ्ठी दिली असता, मुलीने चिठ्ठी घेण्यास नकार दिल्याने आराेपीने अश्लील शब्दात बाेलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि कलम ३५४ (अ)(२), ३५४ (ड), ५०९, पाेक्साे सहकलम १२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीस अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक शुभांगी तकीत करीत आहेत.