राहुलची हत्या करणाऱ्यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 23:49 IST2018-08-04T23:47:33+5:302018-08-04T23:49:08+5:30

जीएस कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या राहुल राधारमण तिवारी या विद्यार्थ्याचा किरकोळ वादातून मृत्यू झाला. राहुलच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी शनिवारी सायंकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आला.

Arrest the killers of Rahul | राहुलची हत्या करणाऱ्यांना अटक करा

राहुलची हत्या करणाऱ्यांना अटक करा

ठळक मुद्देआप्तस्वकीयांनी काढला कॅण्डल मार्च : जीएस कॉलेज समोर निदर्शने

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : जीएस कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या राहुल राधारमण तिवारी या विद्यार्थ्याचा किरकोळ वादातून मृत्यू झाला. राहुलच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी शनिवारी सायंकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आला.
सायंकाळी ५ वाजता राहुलचे मित्र, आप्तस्वकीय व विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ते जीएस कॉलेजच्या प्रवेशद्वारावर एकत्र झाले. प्रवेशद्वारापुढे राहुलचा फोटो ठेवून श्रद्धांजली देण्यात आली. निदर्शने करण्यात आली. त्यानंतर कॅण्डल मार्च संविधान चौकाकडे निघाला. कॅण्डल मार्च मध्ये सहभागी झालेल्यांच्या हातात ‘जस्टीस फॉर राहुल’ चे फलक झळकत होते. राहुलचे वडील राधारमण तिवारी म्हणाले की, त्यांच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून यापुढे कुठल्याही पालकाच्या पाल्याचा असा मृत्यू होणार नाही. राहुलच्या मृत्यूबाबत कॉलेजच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाण दिसत नाही. कॉलेज प्रशासनाकडून राहुलच्या मृत्यूमागचे कारण लपविण्यात येत आहे, असा अरोप यावेळी तिवारी यांनी केला. 

Web Title: Arrest the killers of Rahul