शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सशस्त्र गुंडाचा हैदोस :पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 01:46 IST

सशस्त्र गुंडाने साथीदाराच्या सोबत मेकोसाबाग पुलाजवळ अनेकांना मारहाण करीत दहशत निर्माण केली. या गुंडाला आवरण्यासाठी धावलेल्या पोलिसावरही त्याने धारदार शस्त्राचा वार केला. रविवारी रात्री ११.३० वाजता जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देअनेकांना मारहाण : जरीपटक्यात गुन्हा, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सशस्त्र गुंडाने साथीदाराच्या सोबत मेकोसाबाग पुलाजवळ अनेकांना मारहाण करीत दहशत निर्माण केली. या गुंडाला आवरण्यासाठी धावलेल्या पोलिसावरही त्याने धारदार शस्त्राचा वार केला. रविवारी रात्री ११.३० वाजता जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.पवन प्रीतसिंग संधू (वय २१) असे हल्ला करणाऱ्या गुंडाचे नाव आहे. तर, त्याला रोखण्याच्या प्रयत्नात हाताला दुखापत झालेल्या पोलिसाचे नाव आनंदसिंग भानूप्रसाद ठाकूर (वय ३७) आहे.हातात शस्त्र घेऊन पवन संधू आणि त्याचे दोन साथीदार मेकोसाबाग पुलाजवळ रविवारी रात्री गोंधळ घालत होते. येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते मारहाण करीत असल्याने दहशत निर्माण झाली होती. नियंत्रण कक्षाला कुणीतरी ही माहिती कळविल्याने नियंत्रण कक्षाने जरीपटका पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. त्यामुळे रात्रपाळीत कर्तव्यावर असलेले पोलीस नायक आनंदसिंग ठाकूर आपल्या सहकाºयांसह मेकोसाबाग पुलाजवळ गेले. पोलिसांना पाहून अन्य आरोपी पळून गेले. मात्र, पवन संधू याने हातातील शस्त्राने आनंदसिंगवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला आवरताना आनंदसिंगला जखम झाली. पवनला ताब्यात घेऊन जरीपटका ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर