सशस्त्र हल्ल्यामुळे कोतवालीत दहशत
By Admin | Updated: June 7, 2015 02:38 IST2015-06-07T02:38:05+5:302015-06-07T02:38:05+5:30
जुन्या वादातून एका गटाने दुसऱ्या व्यक्तीच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. वाहनाची तोडफोड केली.

सशस्त्र हल्ल्यामुळे कोतवालीत दहशत
नागपूर : जुन्या वादातून एका गटाने दुसऱ्या व्यक्तीच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. वाहनाची तोडफोड केली. त्यामुळे महालमधील कोठी रोड परिसरात शुक्रवारी दुपारी दहशत निर्माण झाली होती. दोन दिवसांपूर्वी आरोपी कमलेश ताकोते याच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. हा हल्ला प्रवीण लक्ष्मीकांत घाटे (वय २३) आणि साथीदारांनी केला, असा संशय ताकोतेला आला. त्यामुळे शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास कमलेश ताकोते आपल्या चार साथीदारांसह तलवार आणि चाकू घेऊन प्रवीणच्या घरावर धडकला. त्याला जोरजोरात शिवीगाळ करून धमक्या देऊ लागला. प्रसंगावधान राखत घाटे कुटुंबीयांनी आपल्या घराची दारे पक्की लावून घेतली. त्यामुळे आरोपीने प्रवीणचे काका गणेश घाटे यांच्या अॅक्सिसला लाथा आणि चाकू मारून तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. प्रवीणच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी कमलेश ताकोते आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)