शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आईला शिवीगाळ करण्यावरून वाद, विरोध करणाऱ्या धाकट्याची मोठ्या भावाकडून हत्या

By योगेश पांडे | Updated: April 28, 2024 23:14 IST

गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे (३५, टिमकी) असे मृतकाचे नाव आहे तर दिलीप सुरेश गोखे (५१, टिमकी) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. दोघेही एकाच घरी खाली वर रहायचे. दिलीपची बायको त्याला सोडून गेली असून त्याला दारूचे व्यसन आहे.

नागपूर : आईला शिवीगाळ करण्यावरून वाद झाल्यावर विरोध करणाऱ्या सख्ख्या लहान भावाची मोठ्या भावाने हत्या केली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. क्षणिक वादातून संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे (३५, टिमकी) असे मृतकाचे नाव आहे तर दिलीप सुरेश गोखे (५१, टिमकी) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. दोघेही एकाच घरी खाली वर रहायचे. दिलीपची बायको त्याला सोडून गेली असून त्याला दारूचे व्यसन आहे. तो वरच्या मजल्यावर राहतो. तर गौरव हा त्याच्या आईसोबत तळमजल्यावर रहायचा. रविवारी दिलीप दारू पिऊन घरी आला व आरडाओरड करू लागला. त्याच्या आईने त्याला समजविले असता त्याने तिलाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात व दारूच्या नशेत त्याने तिच्यावर वीट उगारली. हे पाहून गौरव संतापला व त्याने विरोध केला. त्यामुळे दिलीप आणखी संतापला. तू आता शांत बसला नाही तर तुझा जीवच घेईन असे म्हणत तो वरच्या मजल्यावर गेला. तेथून त्याने मोठा चाकू आणला व त्याने गौरवच्या गळ्यावर वार केला.चाकू श्वसननलिकेवरच लागल्यामुळे गौरवचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याची माहिती तहसील पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी आरोपी दिलीपला अटक केली आहे. दिलीपने चौकशीदरम्यान केवळ लहान भावाला घारबविण्यासाठी चाकू त्याच्याजवळून फिरविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून दोन्ही भावांच्या आईला तसेच कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस