शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

जाती धर्माच्या नावावर भांडणे आमची संस्कृती नव्हे : माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:22 PM

नागपूरकरांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला आहे. नागपूरकर नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन कार्य करतात. जातीधर्माच्या नावावर भांडणे ही आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.

ठळक मुद्देमो. शरफुद्दीन साहिल यांना प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला आहे. नागपूरकर नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन कार्य करतात. जातीधर्माच्या नावावर भांडणे ही आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार २०१९ राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शंकरनगरच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, मारवाडी फाऊंडेशनचे डॉ. गिरीश गांधी, पुनमचंद मालू, अतुल कोटेचा, विजय दमानी, आमदार गिरीश व्यास उपस्थित होते. विकास सिरपूरकर म्हणाले, प्रबोधनाला आपले जीवन मानणाऱ्या मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांना प्रबोधनाचा पुरस्कार देण्यात आला ही उल्लेखनीय बाब आहे. त्यांनी केलेले समाज प्रबोधनाचे कार्य अलौकिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, मो. शरफुद्दीन साहिल यांना पुरस्कार मिळाला नसता तर प्रबोधनासोबत न्याय झाला नसता. कथाकार, प्रवचनकार होणे सोपे आहे, परंतु प्रबोधनकार होणे अवघड आहे. समाजाला एकजूट ठेऊन वैचारिक उत्थानासाठी प्रवचन, कथेने चालत नाही तर प्रबोधनाची गरज भासते. प्रबोधन हे समाजाचे धन असून समाजातील करंट्या मानसिकतेला उद्बोधनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना मो. शरफुद्दीन साहिल म्हणाले, हा मुस्लीम समाजाचा सत्कार असून यामुळे देशात राष्ट्रीयता संपणार नसल्याचा संदेश मिळतो. भगवद्गीता, रामायण, बायबल आणि कुराणात ईश्वर एक असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु आपण जातीधर्माच्या नावावर भांडतो. आपल्यात भांडणे लावून इंग्रज निघून गेले. समाज जातीधर्माच्या नावावर विखुरल्या जात आहे. धर्म, सत्तेच्या नावावर भांडणे वाढली आहेत. त्यामुळे कबीर, ज्ञानेश्वर, सुफी, संतांनी दिलेल्या एकतेच्या संदेशावर वाटचाल करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकातून गिरीश गांधी यांनी साहिल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. मोहम्मद असदुल्ला यांनी डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी शाल, श्रीफळ आणि एक लाखाचा धनादेश देऊन मो. शरफुद्दीन साहिल यांना पुरस्कार प्रदान केला. संचालन सुधीर बाहेती यांनी केले. आभार अतुल कोटेचा यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूर