वास्तुशास्त्र हा विज्ञानाचा चमत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST2021-07-04T04:06:20+5:302021-07-04T04:06:20+5:30
वास्तुशास्त्रात डॉक्टरेट असलेल्या डॉ. दीपा नंदनवार या वास्तुशास्त्रज्ञ आहेत. चर्चेदरम्यान त्यांनी वास्तूचे अनेक पैलू उघड केले. त्या दुर्वांकुर वास्तुशास्त्र ...

वास्तुशास्त्र हा विज्ञानाचा चमत्कार
वास्तुशास्त्रात डॉक्टरेट असलेल्या डॉ. दीपा नंदनवार या वास्तुशास्त्रज्ञ आहेत. चर्चेदरम्यान त्यांनी वास्तूचे अनेक पैलू उघड केले. त्या दुर्वांकुर वास्तुशास्त्र अॅण्ड रेकी अॅडव्हान्स हिलिंग रिसर्च सेंटरमध्ये वास्तुशास्त्र, रेकी, ज्योतिष, हिलिंग नंबर स्विंचवर्ड असे अनेक अभ्यासक्रम चालवितात. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेलेल्यांना कोणत्याही काळात अपयश येत नाही.
डॉ. दीपा नंदनवार म्हणाल्या, वास्तुशास्त्र हा शब्दच विज्ञान आहे. अथर्ववेदातील एक शाखा स्थापत्यवेद याअंतर्गत वास्तुकला हा विषय येतो. वास्तुशास्त्र हे ब्रह्मांडीय ऊर्जा, ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, पंचतत्त्व, चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण, पृथ्वीच्या अक्षयावर आधारलेले विज्ञान आहे. जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे. जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. आमच्या शरीरात पाच तत्त्व आहेत. हेच पाच तत्त्व आमच्या वास्तूत आहे. आमच्या शरीरात सात ग्रंथी आहेत. त्याला यौगिक भाषेत चक्र म्हणतो. या ग्रंथीमध्ये हे तत्त्व विराजमान आहेत. वास्तूच्या माध्यमातून हे तत्त्व जर बिघडले आमच्या शरीरात त्या तत्त्वाशी संबंधित आजार निर्माण होतो. मनुष्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा संबंध पंचतत्त्वाशी येतो. आपण म्हणतो ना माणूस पंचतत्त्वात विलीन झाला.
आकाश आणि पृथ्वीच्यामध्ये आपण आहोत. वायू अग्नीला, अग्नी पाण्याला, पाणी पृथ्वीला आणि पृथ्वी जीवनदान देते. जीव निर्माण करते. हे तत्त्व शरीरात ऊर्जा बनून ग्रंथीच्या माध्यमातून आमचे रक्षण करते. पृथ्वीचे चुंबकीय तत्त्व आम्हाला स्थैर्य देते. सर्व तत्त्व ऊर्जा एका वस्तूतून दुसऱ्या वस्तूत शक्तिस्वरूप ऊर्जा बनून परावर्तित होत असतात. ऊर्जेच्या एक नियमानुसार ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. या नियमावर वास्तुशास्त्र आधारलेले आहे.
वास्तुशास्त्र ही एक कला आहे. श्रीकृष्णाच्या १६ कला, १६ दिशा, षोडशोपचार या साऱ्या गोष्टी वास्तूत येतात. वास्तुशास्त्र ही दृश्यकला आहे. ही कला मानवी भावनांचा विकास करते जेथे आपण वास्तव्य करतो. वास्तुशास्त्र मानवी जीवनावर चार स्तरावर कार्य करते. ज्या आपल्या चार मुख्य दिशा आहेत त्यांच्या स्तराशी याचा संबंध येतो. १. शारीरिक स्तर, २. मानसिक स्तर, ३. भौतिक स्तर, ४. आध्यात्मिक स्तर. जशा या दिशा वास्तूचा विस्तार करतात तशा विस्तारत जातात. मग त्या १६ दिशा बनतात आणि नंतर त्या दिशेनुसार केलेले भवन निर्माण आम्हाला एक धनवान, यशवान बनविते. नाही तर परेशान करते. शारीरिक स्तरावर आमची संपूर्ण वास्तू विराजमान असते ती वास्तूच्या मर्मस्थानांच्या स्वरूपात. वास्तूनिर्माण करताना हे मर्मस्थान डिस्ट्रर्ब्ड झाले तर शारीरिक व्याधी निर्माण होतात. आमची पृथ्वी जरी गोल असली तरी मनुष्य चौकोनी, आयाताकृती जागेवर राहतो. कारण पृथ्वीतत्त्व हे चौकोनी आहे, जे आम्हाला स्थैर्य देते. जसे आमच्या शरीराचे नाभीस्थान ऊर्जाक्षेत्र आहे. तसेच वास्तूचे ब्रह्मस्थान वास्तूचे ऊर्जास्थान असते. हे जर कुठल्याही कारणाने डिस्ट्रर्ब्ड झाले तर उत्पादन क्षमताच बिघडेल, निर्मिती थांबेल, मग ती जैविक असो की भौतिक असो. याचा संबंध प्रजनाशीदेखील येतो.
माणसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी दिशा म्हणजे उत्तर. उत्तर म्हणजे धन, धंदा, उच्चतरीय प्रगती. यात अपयश म्हणजे वास्तुदोष. निर्णय चुकले आहे, दूरदृष्टी नाही, स्पष्टता नाही, आरोग्याच्या कुरबुरी असतात. शिक्षणात अडथळे येतात. पारिवारिक तणाव आहे म्हणजे ईशान्य बिघडलेली आहे. हेल्थ इश्यू आहेत, तणाव आहे म्हणून आनंद मनोरंजन नाही. इच्छा आहे पण काहीतरी अडचण आहे. त्यामुळे सामाजिक संबंध कमी होतात. नवीन संधीचा फायदा घेता येत नाही. कामाच्या ऑर्डरच येत नाही, मग काय? उत्तर व पूर्व ईशान्य तपासून बघा.
हृदयविकार असेल, कुणी काहीतरी शब्द न पाळल्या गेल्यामुळे बोलले, काम वेळेवर पूर्ण नाही केले तर तणाव येतो. काम पूर्ण नाही तर पैसा नाही, नगदी नाही, खर्च वाढला, पैसा पुरत नाही. कर्ज वाढले तर नक्कीच तुमच्या आग्नेय दिशेतच गडबड आहे. कसातरी पैसा आला, बॉडी लँग्वेज बदलली, पॉवर आणि आत्मविश्वास आला. नेम-फेम पण मिळू लागले. पण याउलट असे होतच नाही तर दक्षिण तुम्हाला क्षीण करत आहे, असे समजा. जास्तच इगो वाढला म्हणून लोक तुम्हाला बदनाम करीत आहेत. खूप मेहनत करता पण यश मिळत नाही. नातेसंबंध बिघडत आहेत. पतप्रतिष्ठा ढासळली आहे. कुणाला मदत मागितली तर ती मिळत नाही. फायद्याऐवजी नुकसान झाले. सगळी बचत निरर्थक गेली आहे, तर तुमची नैऋृत्य कुठेतरी तुम्हाला रोखत आहे. अस्थायीत्व निर्माण करते आहे. तुमचा मान-सन्मान ढासळत आहे. मुले वाममार्गी होत आहेत. शिक्षणात अडचणी येत आहेत. सेव्हिंग संपले आहे. आऊटपुट नाही. पूर्वी केलेल्या इन्व्हेस्टमेंटमुळे पश्चात्ताप करायची वेळ आली. अशातच पत्नीची साथ सुटली तर समजा पश्चिम तुम्हाला मागे आणत आहे. आता या सर्व समस्यांमुळे तुमच्याबद्दल आकर्षणच उरले नाही. ना सपोर्ट, तर समजा तुमची वायव्य तुम्हाला उडवून लावत आहे.
वास्तुशास्त्र हा विज्ञानाचा चमत्कार आहे. वास्तू तुम्हा-आम्हाला निसर्गाशी जुळवून घ्यायला सांगते. निसर्गाशी न जुळवणे म्हणजेच वास्तुदोष आणि या वास्तुदोषासोबत जगणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे होय. प्रवाहाविरुद्ध गेले की, जास्त शक्ती खर्च होऊन अपयश हमखास येईलच. प्रवाहासोबत जगलो तर तुमची वास्तू तुम्हाला सारे सहज करून देते.
कोरोना काळात ज्यांची उत्तर दिशा चांगली होती, त्यांना पैशाच्या अडचणी आल्या नाहीत. काहींच्या नोकऱ्या गेल्या, कर्ज झाले, ईएमआय थकले त्यांच्या उत्तर-आग्नेय दिशेमध्ये दोष आढळले. ज्यांची ईशान्य चांगली होती, त्यामुळे त्यांची इम्युनिटी चांगली होती. ते त्यातही बचावले. हा वास्तूचा फायदा आहे.
वास्तुशास्त्रज्ञ डॉ. दीपा नंदनवार, मो. ९८२३४५२७६७.