शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
2
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
3
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
4
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
5
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
6
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
7
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
8
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
9
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
10
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
12
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
13
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
14
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
15
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
16
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
17
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
19
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
20
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

आर्किटेक्ट निमगडे मर्डर मिस्ट्रीचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:08 IST

-कुख्यात सफेलकर टोळीने केला गेम -मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधून बोलविले शूटर १४ आरोपींचा समावेश, सूत्रधारांसह सहा फरार लोकमत न्यूज ...

-कुख्यात सफेलकर टोळीने केला गेम

-मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधून बोलविले शूटर

१४ आरोपींचा समावेश, सूत्रधारांसह सहा फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तपास यंत्रणांसाठी आव्हान ठरलेल्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यात शहर पोलिसांनी अखेर यश मिळवले. नागपुरातील गँगस्टर रंजित सफेलकर याने ५ कोटी रुपयांची सुपारी घेऊन कुख्यात नब्बूच्या भाडोत्री गुंडांकडून निमगडेंची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांना ही माहिती दिली.

उल्लेखनीय म्हणजे, लोकमतने सोमवारी १५ मार्चच्या अंकात ‘आर्किटेक्ट एकनाथ निमगडे मर्डर मिस्ट्रीचा उलगडा’ करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित केले होेते. पत्रकार परिषदेदरम्यान लोकमतच्या या वृत्ताचीही जोरदार चर्चा झाली.

वर्धा मार्गावरील सुमारे दोनशे कोटींच्या जमिनीचा साैदा १९८२ ला इंडियन सिटिझन वेलफेअर मल्टिपर्पज सोसायटीसोबत निमगडे यांनी ३३ लाखात केला होता. पैशाचा व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे जमिनीचा वाद वाढला. नंतर ५० कोटींच्या या जमिनीची किंमत दोनशे ते अडीचशे कोटीत गेल्याने हा वाद सुटण्याऐवजी चिघळतच गेला. या पार्श्वभूमीवर, ६ सप्टेंबर २०१६ ला एकनाथ निमगडे गांधीबाग गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकला गेले. सकाळी ७ च्या सुमारास ते त्यांच्या मोपेडने घराकडे येत असताना अचानक काळ्या रंगाच्या मोपेडवर तोंडाला स्कार्फ बांधलेल्या तरुणाने त्यांना लाल इमली मार्गावर अडविले आणि देशीकट्ट्यातून बेछूट गोळीबार करून निमगडे यांची हत्या केली. या हत्याकांडाने नागपूरच नव्हे तर त्यावेळी राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी शहरातील संतोष आंबेकर, दिवाकर कोतुलवारसह बहुतांश बड्या गुन्हेगारांची कसून चौकशी केली होती. मात्र, पोलिसांना मारेकरी शोधण्यात यश आले नसल्याने अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मात्र, तीन वर्षे तपास करूनही सीबीआयला प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले नव्हते. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांनी अनडिटेक्ट मर्डरचा छडा लावण्यासाठी शहरातील १० हजारांपेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेणे सुरू केले. त्यातून निमगडे हत्याकांडाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. तपास सीबीआयकडे असल्याने पोलिसांनी आपल्या पद्धतीने या गुन्ह्यातील एकेका गुन्हेगाराला वेगवेगळ्या पद्धतीने बोलते केले अन् हत्याकांडाच्या कड्या जुळविल्या. त्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार, कामठी, नागपूरचा गँगस्टर रणजित सफेलकर याने निमगडेंची हत्या करण्यासाठी पाच कोटींची सुपारी घेतल्याची माहिती पुढे आली. कुख्यात सफेलकरचा राईट हॅण्ड कालू उर्फ शरद हाटे याने जुलै २०१६ मध्ये उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड नब्बू उर्फ नवाब छोटे साहाब याला ही सुपारी दिली.

----

सिनेस्टाईल झाला गेम

नब्बूने मोशू उर्फ मुस्ताक अशरफी, शहबाज, अफसर, फिरोज यांना सोबत घेऊन राजा उर्फ पीओपी, बाबा (दोघेही रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश), परवेज (आजमगड, उत्तर प्रदेश) या शूटर्सना बोलविले. तत्पूर्वी, नब्बूने आपल्या साथीदारांच्या मदतीने निमगडे यांची अनेक दिवस रेकी केली. ठरल्याप्रमाणे १६ सप्टेंबर २०१६ च्या सकाळी राजा, बाबा आणि परवेज तीन पिस्तूल घेऊन एका दुचाकीवर निमगडेंचा पाठलाग करू लागले. कुख्यात नब्बू यांना मॉनिटर करीत होता. लाल इमली गल्लीत संधी मिळताच उपरोक्त तिघांनी बेछूट गोळ्या झाडून निमगडेंची हत्या केली आणि शहरातून पसार झाले.

---

सुपारीवरून वाद

सुपारी घेतल्यानंतर सफेलकर, हाटेने नब्बूला प्रारंभी २० लाख, नंतर १ कोटी आणि नंतर ५० लाख दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, १ कोटी, २० लाख घेतल्यानंतरही निमगडेंची हत्या करण्यास मागेपुढे पाहत असल्याने कालू हाटेने नब्बूला मारहाण केली होती. त्यानंतर नब्बू ॲक्टिव्ह झाला आणि त्याने शूटर्सना बोलवून हे हत्याकांड घडवून आणले.

या हत्याकांडात एकूण १४ आरोपी असून त्यातील ९ जण ताब्यात तर मुख्य सूत्रधार सफेलकर, हाटे आणि नब्बू, परवेजसह ५ आरोपी फरार असल्याचेही अमितेशकुमार यांनी सांगितले.

----

सीबीआयचे पथक दाखल

या हत्याकांडाचा छडा लागल्याची माहिती अमितेशकुमार यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना कळविली. त्यानुसार, सीबीआयचे पथक नागपुरात दाखल झाले. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर टप्प्यात असलेल्या आरोपींना ते अटक करणार आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा गुन्हा शोधून काढण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

---

यूपी एसटीएफशी संपर्क

सुपारी किलर राजा पीओपी आजमगडचा रहिवासी आहे. त्याला शोधून काढण्यासाठी यूपी एसटीएफलाही माहिती देण्यात आली आहे. तर, नब्बू आणि सफेलकर तसेच हाटे यांचा आग्रासह ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे. सफेलकर-हाटे टोळीने मनीष श्रीवास नामक गुंडाची हत्या करून तंदूरच्या भट्टीत त्याचे शव जाळले आणि नंतर ती राख नदीत शिरवल्याचाही आरोप आहे. पोलीस त्या गुन्ह्यातही या दोघांचा शोध घेत आहेत. त्यांना अटक केल्यानंतर ही सुपारी कुणी दिली त्याचा उलगडा होणार आहे.

----

पाच लाखांचे बक्षीस

या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी जो मदत करेल, त्याला सीबीआयने पाच लाख रुपये पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. हा पुरस्कार गुन्हे शाखेतील २३ जणांना दिला जाणार आहे.

----