शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

रामदेवबाबा विद्यापीठास मंत्रिमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 9:43 PM

विदर्भासह राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सत्र २०१९-२० मध्ये श्री रामदेवबाबा विद्यापीठाची स्थापना होईल. या निर्णयामुळे नागपूर विभागात पहिले स्वायत्त विद्यापीठ स्थापन होईल. हे विद्यापीठ विदर्भातील दुसरे राहिल. त्याचबरोबर पुण्यात श्री बालाजी सोसायटीला स्वायत्त विद्यापीठ स्थापण्याची मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देसत्र २०१९-२० पासून सुरू करण्याची मिळाली मान्यतानागपूर विभागातील पहिले सेल्फ फायनान्स विद्यापीठ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सत्र २०१९-२० मध्ये श्री रामदेवबाबा विद्यापीठाची स्थापना होईल. या निर्णयामुळे नागपूर विभागात पहिले स्वायत्त विद्यापीठ स्थापन होईल. हे विद्यापीठ विदर्भातील दुसरे राहिल. त्याचबरोबर पुण्यात श्री बालाजी सोसायटीला स्वायत्त विद्यापीठ स्थापण्याची मंजुरी दिली आहे.मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटने हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण तांत्रिक शिक्षण दिले असून, देशाच्या विकासात उल्लेखनीय भूमिका पार पाडली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कॉलेजला यापूर्वी २०११ मध्ये स्वायत्तेचा दर्जा प्रदान करण्यात आला होता. कॉलेजला आयएसओ ९००१:२००५ दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर नॅकच्या मूल्यांकनात संस्थेला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे.श्री बालाजी सोसायटी पुणे यांच्या माध्यमातून पुण्यातील विद्यापीठाची स्थापना होत आहे. या संस्थेकडून यापूर्वीच व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विधि हे अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत. स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मॉडर्न मॅनेजमेंट, टेलिकॉम मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.असे होणार लाभश्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटचे श्री रामदेवबाबा विद्यापीठात रुपांतर झाल्यानंतर नागपूर विभागाबरोबरच संपूर्ण विदर्भाला त्याचा फायदा होणार आहे. विद्यापीठाच्या रूपात संस्थेला पूर्णत: अभ्यासक्रमाचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे विद्यापीठ रिसर्चवर आधारीत अभ्यासक्रम व औद्योगिक क्षेत्राच्या मागणीनु सार अभ्यासक्रम सुरु करू शकते. त्याचबरोबर भविष्यातील व जागतिक मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना तसे शिक्षण उपलब्ध करून देता येऊ शकते. संस्थेला विद्यापीठासारखेच पूर्ण शैक्षणिक व आर्थिक अधिकार मिळतील. विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.२०१७ मध्ये दिला होता प्रस्तावयासंदर्भात कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, अद्यापपर्यंत आम्हाला कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र कॉलेजकडून २०१७ मध्ये यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी विविध समित्यांनी कॉलेजचा दौरा केला होता. सरकारच्या सर्वच मापदंडामध्ये कॉलेज योग्य ठरले आहे. ते म्हणाले की, कॉलेजमध्ये सध्या इंजिनिअरिंग, एमबीए व एमसीए अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर योजना आखण्यात येईल. यात कुठले अभ्यासक्रम सुरू करता येईल, हे ठरविण्यात येईल . संशोधनावर आधारीत अभ्यासक्रमाला विशेष प्राधान्य देण्याची त्यांची योजना आहे. त्यामुळे विदर्भातील समस्यांचे अध्ययन होईल. देशाच्या विकासात प्रशिक्षित मानव संसाधन तयार होईल.श्रेष्ठतेच्या मापदंडाला पूर्ण केलेश्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीद्वारा संचालित श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटला गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र व देशातही ओळखले जाते. कॉलेजचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय स्तरावर चांगली गुणवत्ता प्रदान केली आहे. मानवसंसाधन विकास मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्युशन रँकिंग फ्रेम वर्क (एनआयआरएफ) मध्ये कॉलेजने उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त केली आहे. कॉलेजच्या कॅम्पस प्लेसमेंटचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दररवर्षी कॉलेजमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात. हेच कारण आहे की, दरवर्षी हजारोच्या संख्येने विद्यार्थी येथे प्रवेश घेतात.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर