शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
3
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
4
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
5
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
6
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
7
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
8
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
9
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
10
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
11
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
12
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
13
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
14
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
15
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
16
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
17
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
18
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
19
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
20
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेतील नियुक्त्या घटनेप्रमाणे व्हाव्यात

By admin | Updated: June 5, 2014 01:02 IST

राज्यपालांनी विधान परिषदेवर नामनियुक्त करायच्या १२ जागांसाठी नावे सुचविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात राजकीय पक्षांनी सोयीच्या नावांचाच समावेश करण्याचा प्रयत्न चालविला आहे

संस्कृती, शिक्षण व समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांना स्थान हवे : महाराष्ट्र सांस्कृ तिक आघाडीची मागणी नागपूर : राज्यपालांनी विधान परिषदेवर नामनियुक्त करायच्या १२ जागांसाठी नावे सुचविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात राजकीय पक्षांनी  सोयीच्या नावांचाच समावेश करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु ज्या विभागातील लोकांची नावे विधान परिषदेसाठी पाठवायची आहेत त्या  विभागातील लोकांना प्रतिनिधित्व नाकारण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेशी हे विसंगत आहे, याकडे महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने लक्ष वेधले  असून राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालयाला यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. राज्यपालांनी विधान परिषदेच्या करावयाच्या १२ जागांवर साहित्य, संस्कृती, शिक्षण व समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवरांची नियुक्ती संविधानाप्रमाणे  अपेक्षित आहे. भारतीय राज्यघटनेत तशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राच्या निर्मितीपासून केवळ तीन - चार नावेच संबंधित  विभागात खर्‍या अर्थाने सुचविण्यात आली आहेत. शिक्षण आणि समाजसेवा या विभागात या क्षेत्राशी संबंध नसलेल्या नेत्यांचीही नियुक्ती या जागांवर  करण्यात आली. एखाद्या नेत्याची शिक्षण संस्था असली याचा अर्थ तो शिक्षणतज्ज्ञ आहे, असा होत नाही. साहित्य, संस्कृती, समाजसेवा व शिक्षण  क्षेत्रातील तज्ज्ञतेचा, विद्वत्तेचा व अनुभवाचा लाभ राज्य शासनाला व्हावा अशा व्यक्ती निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध होणे शक्य नसल्याने  विधिमंडळाला त्यांच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी घटनेने हा अधिकार निर्माण केला आहे. पण त्याचा सर्रास दुरुपयोग करण्यात येतो. या जागांचा  वापर केवळ पक्षीय राजकारणासाठी होतो याकडे आघाडीने लक्ष वेधले आहे. आतापर्यंंंत चार नावे वगळता सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना या  जागांवर संधीच नाकारण्यात आल्याची बाब अभय कोलारकर यांनी केलेल्या माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. यंदा या नियुक्त्या साहित्य, संस्कृती, समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या न करण्यात आल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात  आला आहे. याप्रकरणी राज्यपालांनीही गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी राजकारण्यांचीच नावे समोर केल्यास  राज्यपालांनी आपला अधिकार वापरून घटनेला अपेक्षित नियुक्त्या कराव्यात, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)