शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नगरसेवकांच्या रिपोर्ट कार्डनुसार समित्यांवर नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:13 IST

मनपाच्या विशेष समित्यांमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी भाजपचे नगरसेवक सक्रिय झले आहेत. परंतु या समित्यांमध्ये नियुक्ती करताना नगरसेवकांचे रिपोर्ट कार्डही तपासले जाणार आहे. या नियुक्तीमध्ये लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आणि आगामी विधानसभा निवडण्ूक याचा प्रभाव सुद्धा स्पष्टपणे राहणार आहे. ज्या नगरसेवकांच्या प्रभागात भाजपला कमी मते मिळाली, त्यांना साईडलाईन करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. असे असले तरी आमदार आपल्या समर्थक नगरसेवकाला पुन्हा समितीत संधी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एकूण नगरसेवकांच्या रिपोर्ट कार्डवरच त्यांच्या निवडीचे भविष्य अवलंबून आहे.

ठळक मुद्देभाजप नगरसेवक सक्रिय : समितीत जागा मिळवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मनपाच्या विशेष समित्यांमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी भाजपचे नगरसेवक सक्रिय झले आहेत. परंतु या समित्यांमध्ये नियुक्ती करताना नगरसेवकांचे रिपोर्ट कार्डही तपासले जाणार आहे. या नियुक्तीमध्ये लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आणि आगामी विधानसभा निवडण्ूक याचा प्रभाव सुद्धा स्पष्टपणे राहणार आहे. ज्या नगरसेवकांच्या प्रभागात भाजपला कमी मते मिळाली, त्यांना साईडलाईन करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. असे असले तरी आमदार आपल्या समर्थक नगरसेवकाला पुन्हा समितीत संधी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एकूण नगरसेवकांच्या रिपोर्ट कार्डवरच त्यांच्या निवडीचे भविष्य अवलंबून आहे.येत्या २० जून रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत दहा विशेष समित्यांच्या सदस्यांची आणि सभापतींच्या नावांची घोषणा करण्यात येईल. यामध्ये स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती, वैद्यकीय व सेवा समिती, विधि व सामान्य समिती, शिक्षण समिती, स्लम निर्मूलन व गृहनिर्माण समिती, क्रीडा समिती, महिला व बालकल्याण समिती, जलप्रदाय समिती, कर संकलन समिती आणि अग्निशमन व विद्युत समितीचा समावेश आहे.समितींच्या कामाचा आढावा घेतला तर सर्वात खाली अग्निशमन व विद्युत समिती, स्लम निर्मूलन व गृहनिर्माण समिती, शिक्षण समिती राहिली आहे. अग्निशमन विभागात सातत्याने कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होत आहे. येथे १५० पेक्षाही कमी लोक उरले आहेत. त्रिमूर्तीनगर फायर स्टेशन बनून तयार आहे. परंतु त्याचे लोकार्पण सुद्धा झालेले नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचे लोकार्पण होणार होते. परंतु आॅक्युपेंसी सर्टिफिकेट सुद्धा घेता आले नाही. मनुष्यबळाचीही कमतरता आहे. समितीचे सभापती लहुकुमार बेहते एखादवेळेसच बैठक घेतात. परंतु त्यांच्या उपस्थितीचा परिणामही दिसून येत नाही. त्याचप्रकारे स्लम निर्मूलन आणि गृहनिर्माण समितीच्याही ठराविकच बैठका झाल्या. गृहनिर्माणाला प्रोत्साहन देण्यासाठी कुठलेही प्रभावी पाऊल उचलण्यात आलेले नाही. शिक्षण समितीसुद्धा अपयशी ठरली आहे. दहावी व बारावीचे निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप घसरले आहे. तसेच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही कमी होत आहे. अभियान तर खूप चालवण्यात आले परंतु ते अपयशी ठरले.परिवहनचे सहा सदस्य होणार घोषितपरिवहन समितीतून सेवानिवृत्त झालेले १२ पैकी ६ सदस्यांच्या नावाची घोषणाही बैठकीत होईल. यात भाजपचे ५ आणि बसपाचा एक सदस्य राहील. परिवहन समितीबाबत नगरसेवकांना आकर्षण हेते, परंतु सध्या परिवहन समिती तोट्यात चालत आहे. त्यामुळे या समितीलाही रुळावर आणणे मोठे आव्हान आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका