विदर्भात पुन्हा दोन मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:07 IST2021-06-04T04:07:04+5:302021-06-04T04:07:04+5:30

नागपूर : मागील महिन्यात राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्तीची यादी जाहीर केल्यावर आता राज्य सरकारने पुन्हा दोन मानद वन्यजीव ...

Appointment of two honorary wildlife rangers again in Vidarbha | विदर्भात पुन्हा दोन मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या

विदर्भात पुन्हा दोन मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या

नागपूर : मागील महिन्यात राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्तीची यादी जाहीर केल्यावर आता राज्य सरकारने पुन्हा दोन मानद वन्यजीव रक्षकांच्या नव्याने नियुक्त्या जाहीर केल्या आहे. यात नागपूर आणि गडचिरोली येथील दोघांचा समावेश आहे.

नागपूर जिल्ह्यासाठी अविनाश लोंढे आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी उदय पटेल या दोघांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. वनविभागाने बुधवारी या संदर्भात आदेश जारी करून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार आहे. मागील महिन्यात जाहीर केलेल्या यादीमध्ये ४८ व्यक्तींची नावे जाहीर केली होती. त्यानंतर या यादीवरून राज्यातील काही जिल्ह्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांची संख्या आता ५० झाली आहे.

Web Title: Appointment of two honorary wildlife rangers again in Vidarbha