शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

एमएसईबीकडून बेकायदेशीरपणे पीआर एजन्सीची नियुक्ती; दरमहा २४ लाखांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 16:00 IST

थेट कंत्राट, दरमहा २४ लाखांचा खर्च

- आशिष रॉयनागपूर : तीन सरकारी वीज कंपन्या ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली असताना, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी एमएसईबी होल्डिंग कंपनी बेकायदेशीरपणे लाखोंची उधळपट्टी करत आहे. कंपनीने डिसेंबर २०२१ मध्ये गुडगाव येथील जनसंपर्क कंपनीची कोणतीही निविदा न काढता नियुक्ती केली. संबंधितांना दरमहा २४ लाख रुपये देण्यात येत आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे स्वत: एमएसईबी होल्डिंग कंपनीचे अध्यक्ष असताना, कुठलीही निविदा न काढता अशाप्रकारे काम दिल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

एमएसईबी होल्डिंग कंपनी, एमएसईडीसीएल, महाजेनको, महाट्रान्स्को आणि मेडा (महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेन्ट एजन्सी) यांची सोशल माध्यमे हाताळण्यासाठी संबंधित जनसंपर्क कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. तसे पाहिले तर, हे काम फारसे कष्टाचे नाही. एमएसईबी होल्डिंग कंपनी आणि महाट्रान्स्को यांचा प्रत्यक्ष सार्वजनिक संपर्क कमी असून, त्यांना सोशल माध्यमांची इतकी आवश्यकता नाही, तर महावितरणकडे स्वतंत्र जनसंपर्क विभाग असून, तेथे मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांच्याकडूनच सोशल माध्यमांचे व्यवस्थापनदेखील करण्यात येते. महाजेनकोमध्येही दोन जनसंपर्क अधिकारी आहेत. असे असताना निविदा न काढता संबंधित कंपनीला काम देण्यात आले.

वीज कंपन्यांमधील एका सूत्राने सांगितले की, महावितरण, महाजेनको आणि मेडा यांनी त्यांचे स्वत:चे जनसंपर्क विभाग मजबूत केले असते, तर त्याची किंमत खूपच कमी झाली असती. तो खर्च जास्तीत-जास्त दीड लाख रुपये प्रतिमहिना झाला असता. जेव्हा तीन कंपन्या त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात, तेव्हा अशी उधळपट्टी हा तर गुन्हाच आहे, असे मत संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केले.

काहीही बेकायदा नाही

संबंधित ‘एलओए’ (लेटर ऑफ अवॉर्ड) एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक (वित्त) सुनील पिंपळखुटे यांनी जारी केले होते. ते आता निवृत्त झाले आहेत. संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात काहीही बेकायदेशीर नाही. कारण ती कंपनी महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या यादीत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

ऊर्जामंत्री म्हणतात, माहितीच नाही

एमएसईबीने अशी कुठली पीआर एजन्सी परस्पर नियुक्त केली आहे का, याची आपल्याला माहिती नाही. याची विभागाकडून माहिती घेतली जाईल व त्यानंतरच काय ते स्पष्ट होईल.- डॉ. नितीन राऊत,  ऊर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतelectricityवीज