शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वन मुख्यालयाच्या बोगस लेटर हेडवर वनरक्षक पदाची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:01 IST

Nagpur : सदर पोलिस स्टेशनमध्ये केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर मुख्यालयाच्या नावाने बनावट लेटर पॅडवर एका तरुणाला वनरक्षक पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवक हे नियुक्तीपत्र घेऊन मुख्यालयी पोहोचला होता. हा बोगस नियुक्ती आदेश पाहून वनविभागात मंगळवारी खळबळ उडाली. बोगस लेटर हेडच्या आधारे नोकरी देण्याचे रॅकट सक्रिय असल्याच्या संशयावरून वनविभागाने ताबडतोब सदर पोलिस स्टेशनमध्ये लिखित तक्रार दाखल केली आहे.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील सांगवी रेल्वे निवासी चेतन मोहन जाधव नामक तरुण वन मुख्यालयाच्या लेटर हेडवर मिळालेले नियुक्तीपत्र घेऊन रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स येथे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या वनभवन येथील कार्यालयात पोहोचला. त्याला गोंदिया वनविभागांतर्गत वनरक्षक पदावर नियुक्तीपत्र देण्यात आले होते. चेतन जाधवला हे नियुक्तीपत्र १६ डिसेंबर २०२४ रोजी देण्यात आले व गोंदिया वनविभागात रुजू होण्यासाठी पाठविण्यात आले होते. तो गोंदियालाही पोहोचला. त्याचे नियुक्तीपत्र पाहून तेथील अधिकारीही बुचकळ्यात पडले. मात्र कथित नियुक्तीपत्र पाहून गोंदिया वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही संशय आला. त्यांनी जाधव याला पत्र घेऊन नागपूर येथील वन मुख्यालयात जाण्याचा सल्ला दिला. नागपुरातील वन मुख्यालयात कथित नियुक्तीपत्राची तपासणी केली असता ते बोगस असल्याचे आढळून आले. 

या घटनेमुळे वन मुख्यालयाच्या बोगस लेटर पेंडद्वारे वनविभागात नोकऱ्या देण्याचा दावा करणारे रॅकेट सक्रिय आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतर उपवनसंरक्षक (मानव संसाधन प्रशासन) वन मुख्यालय यांच्यावतीने सदर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आलेला युवक सत्य लपवीत आहे काय? या तरुणाने त्याच्या व्हॉट्सअॅपवर हे बोगस नियुक्तीपत्र आल्याची माहितीही वन मुख्यालयाला दिली आहे. त्यामुळे युवक सत्य लपवत असल्याचा संशय आहे. यासोबतच सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या उपरोक्त पत्राची माहितीही समोर येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागnagpurनागपूर