बस आॅपरेटरची नियुक्ती थांबली

By Admin | Updated: August 9, 2014 02:30 IST2014-08-09T02:30:41+5:302014-08-09T02:30:41+5:30

महापालिका प्रशासनाने शहरात नवीन बसेस चालविण्याची तयारी चालविली आहे. यासाठी साईताज कृपा या नवीन बस आॅपरेटरची नियुक्ती जवळपास निश्चित आहे.

The appointment of the bus operator stopped | बस आॅपरेटरची नियुक्ती थांबली

बस आॅपरेटरची नियुक्ती थांबली

नागपूर : महापालिका प्रशासनाने शहरात नवीन बसेस चालविण्याची तयारी चालविली आहे. यासाठी साईताज कृपा या नवीन बस आॅपरेटरची नियुक्ती जवळपास निश्चित आहे. करारातील अटी व शर्तीतील काही बाबींवर प्रशासन व आॅपरेटर यांच्यात एकमत न झाल्याने आॅपरेटरची नियुक्ती थांबली आहे.
प्रशासन व आॅपरेटर यांनी आपसात चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे निर्देश शुक्र वारी परिवहन समितीच्या बैठकीत देण्यात आले. बस आॅपरेटरची नियुक्ती , रॉयल्टी व विद्यार्थ्यांना पास सवलत आदी विषयावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समितीचे सभापती बंडू राऊ त यांनी दिली. बससेवा चालविण्यासाठी पाच निविदा आल्या होत्या . यातील नागपूरच्या साईताज कृपा आॅपरेटरला कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु कराराचा कालावधी, जाहिराती व बँकेची हमी आदी बाबीवर सहमती न झाल्याने नियुक्तीची प्रक्रि या थांबली आहे. आॅपरेटरला ३० वर्षांसाठी करार पाहिजे तर मनपा १० वर्षासाठी राजी आहे. खासगी १०० बसेसवरील जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मनपाचा वाटा राहणार नाही, अशी आॅपरेटरची भूमिका आहे तर यात ५० टक्के वाटा द्यावा, अशी मनपाची मागणी आहे. मनपा प्रतिबस ५० हजारांची बँक हमी मागत आहे तर आॅपरेटरने १५ हजाराची तयारी दर्शविली आहे.प्रतिबस ३५०० रुपये रॉयल्टी देण्याची आॅपरेटरची तयारी दर्शविली आहे. बस चालविण्यासाठी पाच आॅपरेटरांनी निविदा सादर केल्या होत्या. यात नागपुरातील साईताज कृपा बस सुविधा प्रा. लि.,मे.ट्रॅव्हल टाइम कार रेन्टल प्रा. लि.(पुणे) संजय ट्रॅव्हल (नागपूर), मे. ट्रॅव्हल टाइम कार्स इंडिया प्रा.लि.(पुणे) व अंबा माल वाहतूक सेवा संस्था (अमरावती) आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)

Web Title: The appointment of the bus operator stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.