४२८ जणांची मीडिया सेलवर नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:09 IST2021-01-23T04:09:47+5:302021-01-23T04:09:47+5:30

कन्हान : महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्यावतीने ४२८ कार्यकर्त्यांची मीडिया सेलच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस ...

Appointment of 428 persons on Media Cell | ४२८ जणांची मीडिया सेलवर नियुक्ती

४२८ जणांची मीडिया सेलवर नियुक्ती

कन्हान : महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्यावतीने ४२८ कार्यकर्त्यांची मीडिया सेलच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्ष रोशन गुप्ता व राष्ट्रीय समन्वयक गौरव पांधी यांच्या आदेशानुसार नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभिजित सपकाळ यांच्या मार्गदर्शनात व काेर कमिटीचे सदस्य सुमित लोणारे यांच्या सहयोगाने आनंद गुप्ता यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, काटाेल विधानसभा अध्यक्षपदी सद्दाम पठाण, सावनेर विधानसभा अध्यक्षपदी संजय देशमुख, हिंगणा विधानसभा अध्यक्षपदी जयेश कोहाड, उमरेड विधानसभा अध्यक्षपदी रजत केदार, कामठी विधानसभा अध्यक्षपदी पूर्वल ताकीत, तर रामटेक विधानसभा अध्यक्षपदी राहुल कोठेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Appointment of 428 persons on Media Cell