वंदे मातरम् हेल्थ पोस्टसाठी आठ दिवसांत प्रस्ताव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST2021-02-06T04:15:00+5:302021-02-06T04:15:00+5:30
नागपूर : नागपूर शहरात ७५ वंदे मातरम् हेल्थ पोस्ट तयार करण्याचा संकल्प महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. हेल्थ ...

वंदे मातरम् हेल्थ पोस्टसाठी आठ दिवसांत प्रस्ताव द्या
नागपूर : नागपूर शहरात ७५ वंदे मातरम् हेल्थ पोस्ट तयार करण्याचा संकल्प महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. हेल्थ पोस्टसाठी आठ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौरांनी शुक्रवारी दिले.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे अमलात आणण्यात येणाऱ्या व प्रस्तावित योजनांचा आढावा महापौरांनी घेतला. महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके, उपनेता वर्षा ठाकरे, उपायुक्त मिलिंद मेश्राम (कर), नगर रचना सहायक संचालक हर्षल गेडाम, आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर उपस्थित होते. महापौर तिवारी यांनी सांगितले की, हेल्थ पोस्ट महत्त्वाची योजना आहे. ६८ जागांची निवड करण्यात आली आहे. सर्व हेल्थ पोस्टमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
............