शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन लागू करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 20:32 IST

विधान परिषदेत बुधवारी विरोधी बाकांवरील सदस्यांकडून कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी पीकविम्याच्या मुद्यावरून विरोधकांनी शासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन लागू करा, अशी मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देविरोधकांची मागणी : पीकविम्यावरून शासनावर टीका

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : विधान परिषदेत बुधवारी विरोधी बाकांवरील सदस्यांकडून कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी पीकविम्याच्या मुद्यावरून विरोधकांनी शासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन लागू करा, अशी मागणी करण्यात आली.धनंजय मुंडे, शरद रणपिसे, सुनील तटकरे यांच्यासह विविध सदस्यांनी विधान परिषदेत निमय २६० अन्वये प्रस्ताव मांडला. राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी प्रस्तावावर बोलण्यास सुरुवात केली. राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना २०१६-१७ या वर्षाचा पीकविमा वितरित करण्यात आला नाही. खासगी बँकांकडूनदेखील शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. शिवाय आॅनलाईन अर्जांमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असून यामुळे इतरांना मात्र व्यवसाय मिळाला आहे, असे पंडित म्हणाले. रामहरी रुपनवर यांनी तर शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी, अशी मागणीच केली. देशातील ४ ते ५ राज्यांमध्ये अशी योजना आहे. त्यामुळे तेथे शेतकरी आत्महत्येचे प्रमाणदेखील कमी आहे. राज्यानेदेखील यासंदर्भात पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. तूर डाळी ठेवण्यासाठी राज्यात गोदामे कमी पडत आहेत, अशा स्थितीत बाहेरून डाळ का आयात करण्यात आली, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांपर्यंत कृषीबाबतच्या विविध योजनांची माहिती तत्काळ पोहोचावी, यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे परिषद दोनदा स्थगितदरम्यान, अमरसिंह पंडित यांनी प्रस्तावावर बोलण्यास सुरुवात केली असता राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. संवेदनशील व अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना एकाही विभागाचा सचिव अदृश्य दालनात नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचेच यातून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली. सचिवांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते, असे संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उपसभापतींनी दोनदा सभागृहाचे कामकाज १५-१५ मिनिटांसाठी तहकूब केले. अखेर सचिव पोहोचल्यानंतरच कामकाजाला सुरुवात झाली.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Farmerशेतकरी