रुग्णालयात लागू करा जमावबंदी
By Admin | Updated: May 26, 2014 00:57 IST2014-05-26T00:57:12+5:302014-05-26T00:57:12+5:30
डॉक्टर आणि रुग्ण यांच्या संबंधामधील मानवतेची किनार पुसटशी झाली आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे डॉक्टर-पेशंट बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब ठरत आहे. रुग्णालयातील डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी

रुग्णालयात लागू करा जमावबंदी
डॉक्टरांवर हल्ले रोखण्यासाठी : मेयोची मागणी नागपूर : डॉक्टर आणि रुग्ण यांच्या संबंधामधील मानवतेची किनार पुसटशी झाली आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे डॉक्टर-पेशंट बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब ठरत आहे. रुग्णालयातील डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी जमावबंदी लागू करा, अशी मागणी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो) प्रशासनाने जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्याकडे केली आहे. मेयो रुग्णालयात मागील काही महिन्यात घडलेल्या घटनांना घेऊन डॉक्टरांमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण आहे. सुरक्षा रक्षकांच्या तोकड्या संख्येमुळे अशा घटना वाढतच आहे. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश जारी केला असला तरी घटना घडून गेल्यानंतरच तो अमलात आणला जातो. या घटनांवर आळा घालण्यासाठी रुग्णालयात कायमस्वरूपी जमावबंदी लागू करावी, एका रुग्णासोबत चारपेक्षा जास्त नातेवाईकांना प्रवेश नाकारण्यात यावा, चारपेक्षा अधिक नातेवाईकांची गरज असल्यास रुग्णालय प्रशासनाची लेखी परवानगी घ्यावी, रुग्णालयाच्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर अधिकार रुग्णालय प्रशासनाला बहाल करण्यात यावे, पोलीस चौकीत २४ तास पोलीस कर्मचार्यांची नेमणूक हवी, अशा मागण्या इंदिरा गांधी रुग्णालय प्रशासनाने जिल्हाधिकार्यांकडे केल्या आहेत. (प्रतिनिधी)