लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : असे राजरोस अनेकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे कित्येक सफरचंद पडले असतील. मात्र, ते का पडले? याचा विचार कोणी केला नाही. ते सफरचंद कुणाच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे पडले, त्याचे डोके, बुद्धी महत्त्वाची आहे. ते टाळकं न्युटनचे होते म्हणून म्हणून काही तरी गडबड आहे.. असा प्रकाश त्याच्या डोक्यात आला आणि तो ती गडबड काय, याचा शोध घेण्यासाठी देहभान विसरला म्हणून गुरुत्त्वाकर्षण असा काही प्रकार असतो, हे जगताला कळले. आता तो शोध कुणी लावला? यापेक्षाही तो शोध महत्त्वाचा, हे जाणून घ्या... असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते सतीश फडके यांनी आज येथे केले.स्व. प्रकाश साठे स्मृतीप्रित्यर्थ डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात द्विदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात सोमवारी सतीश फडके ‘सोशल मिडियाच्या जगात ज्ञानेश्वर की आईन्स्टाईन’ या विषयावर बोलत होते.ज्ञानेश्वर आणि आईन्स्टाईन, या दोन भिन्न व्यक्ती एक संकल्पना आहेत आणि या दोन्ही संकल्पनांमध्ये अवघा देश विभागला गेला आहे. अध्यात्म आणि विज्ञान असे दोन विभाग त्यांचे असून, या दोघांनाही त्यांच्या साम्राज्याशी काही घेणे देणे नाही. मात्र, विज्ञान की अध्यात्म.. असे श्रेष्ठत्त्व ठरविण्यासाठी त्यांचे सैन्यच आपापसात भिडले आहेत. विज्ञान जे दिसेल त्यावर विश्वास ठेवतो. तर, अध्यात्म विश्वास ठेऊन बघण्यास सांगतो. आता गॅलिलिओ, न्यूटन, आईन्स्टाईन यांनी अध्यात्माचीच पायरी चढत संशोधन केले. त्यांना आढळलेल्या गोष्टींवर ‘असे होऊ शकते’ असा विश्वास ठेवला आणि मगच, संशोधनातून त्यांनी त्या गोष्टींची सिद्धता केली. गॅलिलिओ ने चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते यातून पृथ्वी गोल असल्याचे सिद्ध केले. तर, राईट बंधूंनी पक्षी उडू शकतो तर आपण का नाही, असा विश्वास ठेवत उड्डाण केले. तसे पाहता, हा शोधांचा विषय नाही तर बुद्धीचा विषय आहे.कोणतीही सिद्धता करण्यासाठी झपाटलेपणा महत्त्वाचा असतो. तंत्रज्ञान नित्य विकसित होत असताना, आपली मानसिकताही तेवढ्याच पटीने विकसित नको का व्हायला? असा सवाल उपस्थित करत सतीश फडके यांनी अध्यात्म आणि विज्ञानाचा कानोसा घेत.. प्रगती आणि बौद्धीकर विकासाशी द्वारे कशी उघडता येतील.. याची उत्तरे दिली. प्रास्ताविक सुबोध साठे यांनी केले. संचालन आसावरी यांनी केले. तत्पूर्वी डॉ. अविनाश देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, अरुंधती साठे उपस्थित होत्या.
‘सफरचंद’ महत्त्वाचे नाही, ते टाळकं ‘न्यूटन’चे होते हे महत्त्वाचे : सतीश फडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:14 IST
असे राजरोस अनेकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे कित्येक सफरचंद पडले असतील. मात्र, ते का पडले? याचा विचार कोणी केला नाही. ते सफरचंद कुणाच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे पडले, त्याचे डोके, बुद्धी महत्त्वाची आहे. ते टाळकं न्युटनचे होते म्हणून म्हणून काही तरी गडबड आहे.. असा प्रकाश त्याच्या डोक्यात आला आणि तो ती गडबड काय, याचा शोध घेण्यासाठी देहभान विसरला म्हणून गुरुत्त्वाकर्षण असा काही प्रकार असतो, हे जगताला कळले. आता तो शोध कुणी लावला? यापेक्षाही तो शोध महत्त्वाचा, हे जाणून घ्या... असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते सतीश फडके यांनी आज येथे केले.
‘सफरचंद’ महत्त्वाचे नाही, ते टाळकं ‘न्यूटन’चे होते हे महत्त्वाचे : सतीश फडके
ठळक मुद्देस्व. प्रकाश साठे स्मृती व्याख्यानमाला