शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

सीबीएसईची ‘नीट’वरील आदेशाविरुद्धची याचिका खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:14 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या १५ जून रोजी ‘नीट’ परीक्षा गोंधळ प्रकरणात दिलेल्या आदेशाविरुद्ध केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका खारीज करण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दुल नझीर व इंदू मल्होत्रा यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे मंडळाला पुन्हा एकदा जोरदार दणका बसला तर, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या १५ जून रोजी ‘नीट’ परीक्षा गोंधळ प्रकरणात दिलेल्या आदेशाविरुद्ध केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका खारीज करण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दुल नझीर व इंदू मल्होत्रा यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे मंडळाला पुन्हा एकदा जोरदार दणका बसला तर, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.उच्च न्यायालयाने हुडकेश्वर येथील आदर्श संस्कार विद्यालयातील खोली क्र. ३९ मध्ये रोल नंबर असणाऱ्या २४ विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी १८० पैकी केवळ १५० मिनिटे मिळाल्याचा दावा मान्य करून त्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा आदेश दिला आहे. अशा प्रकरणात विद्यार्थ्यांना कशाप्रकारे अतिरिक्त गुण द्यायचे याचे सूत्र सर्वोच्च न्यायालयाने ‘दिशा पांचाळ’ प्रकरणावरील निर्णयात ठरवून दिले आहे. मंडळाला त्या आधारावर या विद्यार्थ्यांना गुण द्यायचे आहेत. उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना २२ जूनपर्यंत सुधारित गुणपत्रिका देण्यात याव्यात असे मंडळास सांगितले होते. ही वेळ निघून गेल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाचे पालन करण्यासाठी मंडळाला आणखी १० दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.असा झाला होता गोंधळ‘नीट’ परीक्षा तीन तासांची होती. त्यासाठी सकाळी १० ते १ वाजताची वेळ देण्यात आली होती. आदर्श संस्कार विद्यालयातील खोली क्र. ३९ मधील विद्यार्थ्यांना सीलबंद लिफाफ्यामध्ये प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. दरम्यान, समवेक्षकाने पुढील सूचनेशिवाय लिफाफा उघडू नये, अशी सूचना केली. त्यामुळे कुणीच लिफाफा उघडला नाही. सकाळी १०.३० वाजता वरिष्ठ समवेक्षक आल्यानंतर त्यांनी ताबडतोब लिफाफा उघडून पेपर सोडवायला सुरुवात करण्यास सांगितले. त्यावेळी विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी दुपारी १.३० वाजतापर्यंत वेळ मिळेल असे वाटले होते. परंतु, त्यांचे पेपर अगदी वेळेवर, म्हणजे, दुपारी १ वाजताच परत घेण्यात आले. त्यामुळे वैष्णवी मनियार या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी केली व विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सुरू करण्याची परवानगी देण्यास किमान २० मिनिटे विलंब करण्यात आला असा अहवाल दिला होता. वैष्णवीतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, अ‍ॅड. रोहण चांदूरकर व अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी कामकाज पाहिले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८