शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अ‍ॅप डाऊनलोड केले, ९९ हजार गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 12:09 IST

Nagpur News अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून आरोपीने पाचवेळा पासवर्ड टाकण्यास सांगितला. त्यानंतर एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ९९ हजार ९४० रुपये काढून घेतल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून आरोपीने पाचवेळा पासवर्ड टाकण्यास सांगितला. त्यानंतर एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ९९ हजार ९४० रुपये काढून घेतल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ मार्च २०२१ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

 

रवी श्रीलल्लन शर्मा (२७) रा. चिंचभुवन वर्धा रोड यांनी आपल्या आईच्या उपचारासाठी १० हजार रुपये गुगल पे अकाऊंटद्वारे ऑनलाईन पाठविले होते; परंतु रक्कम न पोहोचल्यामुळे त्यांनी गुगल पे कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर संपर्क साधला. दरम्यान, आरोपीने शर्मा यांना अ‍ॅप डाऊनलोड करायला लावले. त्यानंतर दिलेला पासवर्ड आरोपीने पाचवेळा टाकायला लावला. पासवर्ड टाकल्यानंतर शर्मा यांच्या एचडीएफसी बँक अकाऊंटमधून पाचवेळा ट्रान्झक्शन होऊन एकूण ९९ हजार ९४० रुपयांची रक्कम आरोपीने वळती केली. शर्मा यांनी बँकेत व सायबर सेलमध्ये तक्रार दिल्यानंतर त्यांची रक्कम आरोपी रा. रतन रा. ई. डब्ल्यू. एस. २५, सेक्टर एम. एस. बी. आय. कॉलनी, पोस्ट अलिगड, उत्तरप्रदेश याच्या खात्यावर जमा झाल्याचे समजले. या प्रकरणी शर्मा यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४१९, ४२०, सहकलम ६६ (सी), ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

..........

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम