शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नागपुरात ‘एओर्टिक डिसेक्शन’ दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 9:44 PM

साठी गाठलेल्या एका रुग्णाच्या हृदयातील एक झडप (एओर्टिक व्हॉल्व) अकार्यक्षम झाली. परिणामी, मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला. अर्धांगवायूची लक्षणे दिसू लागली. सोबतच रुग्णाचे मूत्रपिंड (किडनी) निकामे होण्यास सुरुवात झाली. ‘एओर्टिक डिसेक्शन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजारात शस्त्रक्रिया हाच पर्याय होता. परंतु या शस्त्रक्रियेत ९९ टक्के रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यात २४ तासात तातडीने शस्त्रक्रिया करणेही आवश्यक होते. त्यामुळे आधीच या शस्त्रक्रियेला पाच मोठ्या हृदय शल्यचिकित्सकांनी नाकारले होते. अखेर हे आवाहन पेलले डॉ. समित पाठक यांनी. आठ तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी रुग्णाला जीवनदान दिले.

ठळक मुद्दे२४ तासात रुग्णाला मिळाले जीवनदान : कृत्रिम झडपेचे व धमनीचेही रोपण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साठी गाठलेल्या एका रुग्णाच्या हृदयातील एक झडप (एओर्टिक व्हॉल्व) अकार्यक्षम झाली. परिणामी, मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला. अर्धांगवायूची लक्षणे दिसू लागली. सोबतच रुग्णाचे मूत्रपिंड (किडनी) निकामे होण्यास सुरुवात झाली. ‘एओर्टिक डिसेक्शन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजारात शस्त्रक्रिया हाच पर्याय होता. परंतु या शस्त्रक्रियेत ९९ टक्के रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यात २४ तासात तातडीने शस्त्रक्रिया करणेही आवश्यक होते. त्यामुळे आधीच या शस्त्रक्रियेला पाच मोठ्या हृदय शल्यचिकित्सकांनी नाकारले होते. अखेर हे आवाहन पेलले डॉ. समित पाठक यांनी. आठ तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी रुग्णाला जीवनदान दिले.अमरावती येथील एका ६० वर्षीय रुग्णाला छातीत दुखायला लागल्याने आणि प्रचंड घाम आल्याने नातेवाईकांनी स्थानिक इस्पितळात भरती केले. प्राथमिक तपासणीनंतर महाधमनी (हृदयातून उगम पावणारी सर्वात मोठी धमनी, जी शुद्ध रक्त शरीराकडे पोहचविते) त्यात मोठा अडथळा आल्याचे निदान झाले. याला इंग्रजीत ‘अ‍ॅक्युट एओर्टिक डिसेक्शन’ असे म्हणतात. त्या सोबतच हृदयातील एक झडप (एओर्टिक व्हॉल्व) अकार्यक्षम असल्याचे निदान झाले. एवढेच नव्हे तर रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे अर्धांगवायूची लक्षणेही दिसू लागली. त्यामुळे रुग्णाला तातडीने नागपुरात हलविले. परंतु नागपुरातील पाच हृदय शल्यचिकित्सकांनी रुग्णाची परिस्थिती फार गंभीर असल्याने व क्लिष्ट शल्यचिकित्सेमुळे उपचार करण्यास नकार दिला. शेवटी वोक्हार्ट हॉस्पिटल येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. समित पाठक यांनी हे आव्हान स्वीकारले. पॉलिस्टर धमनीचे रोपणडॉ. पाठक म्हणाले, रुग्णाच्या नातेवाईकांना जोखमीची माहिती देऊन शस्त्रक्रियेला सुरुवात केली. रुग्णाच्या हृदयाच्या झडपेचे कार्य थांबल्याने कृत्रिम झडप आणि महाधमनीचे उगमस्थान बदलवून त्या ऐवजी पॉलिस्टरची धमनी रोपन केले. यामुळे रक्तपुरवठा सुरळीत झाला. परंतु टिश्यु कमजोर असल्याने टाके लावण्याचे आव्हान होते. रक्तस्रावामुळे रुग्णाची छाती खुली ठेवण्यात आली होती. दुसºया दिवशी टाके लावत छाती बंद करण्यात आली. मूत्रपिंडाचे कार्यही सुरळीत झाले. तीन दिवसाच्या उपचारानंतर रुग्ण चौथ्या दिवशी चालू लागला, हे या शस्त्रक्रियेचे यश होते. ही शस्त्रक्रिया डॉ. समित पाठक, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. अवंतिका, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अंकुर जैन, न्यूरोलॉजिस्ट डॉ. अंकुर जैन, डॉ. शिंदे, डॉ. रिता यांच्यासह जिजो, शिनो आणि शुभांगी यांनी यशस्वी केली.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाdoctorडॉक्टर