शिकाऱ्यांना बंदूक देणाऱ्यास नाकारला अटकपूर्व जामीन

By Admin | Updated: March 23, 2015 02:34 IST2015-03-23T02:34:36+5:302015-03-23T02:34:36+5:30

जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालई रिठी गुमगाव जंगलातील मोराच्या शिकार प्रकरणी भरमार बंदूक उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीचा ...

Anticipatory bail granted to the gunman who denied the killer | शिकाऱ्यांना बंदूक देणाऱ्यास नाकारला अटकपूर्व जामीन

शिकाऱ्यांना बंदूक देणाऱ्यास नाकारला अटकपूर्व जामीन

नागपूर : जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालई रिठी गुमगाव जंगलातील मोराच्या शिकार प्रकरणी भरमार बंदूक उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
गोविंदसिंग देवीसिंग बावरी , असे आरोपीचे नाव असून तो रामठी येथील रहिवासी आहे. या प्रकरणाची हकीकत अशी की, सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. जाधव आणि त्यांचे पथक एका खून प्रकरणाच्या तपासासाठी जात असताना त्यांना गुमगाव भागात एका नहरावर हिरोहोंडा मोटरसायकल संशयास्पद स्थितीत गवसली. परिसराची पाहणी करीत असतानाच चार जण पळताना दिसले. पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले. दशरथ सोनचित्ते, शिवनाथ रामचंद्र सोनचित्ते, किरण नरेंद्र बावणे आणि जगन रामा सहारे, अशी त्यांची नावे होती. ते सर्व वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे तालुक्याच्या परसोडी येथील रहिवासी होते. चौकशीत त्यांनी भरमार बंदुकीने मोराची शिकार केल्याचे सांगितले. त्यांनी दगडाखाली दडवून ठेवलेले जखमी मोर दाखवले. आरोपींकडून बंदूक, नायलॉनचे धागे जप्त करून मोरास उपचारार्थ लोहारी सावंगा येथील उपचार केंद्रात नेण्यात आले. १४ रोजी मोराचा मृत्यू झाला. मोराच्या शवविच्छेदनात छर्रे आढळून आले.
चारही आरोपींना वन्य जीव संरक्षण अधिनियमाच्या कलम १६ (अ),(ब),(क) आणि ५१ तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या ३/२५ कलमान्वये अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी बंदूक गोविंदसिंग बावरी याने दिल्याचे आणि मोटरसायकलही त्याच्याच मालकीची असल्याचे सांगितल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले. गोविंदसिंगने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील लीलाधर शेंदरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Anticipatory bail granted to the gunman who denied the killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.