शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल विरोधी अभियानचा रोखपाल एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:27 IST

कार्यालयीन गैरहजेरीची रक्कम माफ करण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ)पोलीस महानिरीक्षक कार्यायातील एका रोखपालाला एसीबीच्या पथकाने अटक केली. नंदकिशोर भाऊदास सोनकुसरे (वय ३२) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे एएनओ कार्यालय परिसरात गुरुवारी एकच खळबळ निर्माण झाली होती.

ठळक मुद्देविनापगारी रजेसाठी मागितले १२ हजार : लाच स्वीकारताच जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार्यालयीन गैरहजेरीची रक्कम माफ करण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ)पोलीस महानिरीक्षक कार्यायातील एका रोखपालाला एसीबीच्या पथकाने अटक केली. नंदकिशोर भाऊदास सोनकुसरे (वय ३२) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे एएनओ कार्यालय परिसरात गुरुवारी एकच खळबळ निर्माण झाली होती.एसीबीकडे तक्रार करणारे जयवंतनगर, रामेश्वरी परिसरात राहतात. त्यांच्या आईची किडनी खराब झाल्याने गेल्या वर्षी त्यांनी आईच्या औषधोपचाराच्या निमित्ताने अर्जित रजा घेतली होती. अर्जित रजेची मुदत संपल्यानंतरही त्यांना अपरिहार्य कारणामुळे परत कर्तव्यावर हजर होणे शक्य झाले नाही. त्यामुळे ते २२२ दिवस गैरहजर राहिले. त्यातील २६ दिवसांची गैरहजेरी त्यांची परावर्तित रजेत रुपांतरित करण्यात आली. उर्वरित १९७ दिवस त्यांची रजा विनापगारी करण्यात आली. त्यांना तसे कळविण्यात आले. त्यामुळे त्यांनी यूओटीसी कॅम्पसमधील विशेष कृती दल कार्यालयातील रोखपाल नंदकिशोर सोनकुसरे यांची भेट घेतली. सोनकुसरे यांनी गैरहजर (तक्रारदार) कर्मचाºयाला ३७ हजार रुपये रिकव्हरी निघत असल्याचे सांगितले. ती माफ करायची असेल तर १२ हजारांची लाच द्यावी लागेल, असेही म्हटले. तक्रारकर्त्याने सरळ एसीबीचे कार्यालय गाठले. तेथे तक्रार नोंदविल्यानंतर एसीबीच्या अधिकाºयांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारकर्त्यांनी सोनकुसरे यांच्याशी गुरुवारी संपर्क साधून लाचेची रक्कम एकसाथ देणे शक्य होणार नाही, असे म्हटले. सोनकुसरेने त्यांना दोन टप्प्यात रक्कम मागितली. त्यातील ६ हजारांचा पहिला टप्पा गुरुवारी दुपारी देण्याचे ठरले. तक्रारकर्ते सोनकुसरेंकडे लाचेची रक्कम घेऊन गेले. त्यांनी ती रक्कम स्वीकारताच बाजूला दबा धरून बसलेल्या एसबीच्या पथकाने सोनकुसरेच्या मुसक्या बांधल्या.एएनओलाही भ्रष्टाचाराची उधळीनक्षलविरोधी अभियान राबविण्यासारखे महत्त्वपूर्ण कार्य करणाºया एएनओलाही भ्रष्टाचाराची उधळी लागल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, भावना धुमाळे, हवलदार सुनील कळंबे, नायक रविकांत डहाट,प्रभाकर बडे, लक्ष्मण परतेती यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAnti Terrorist Squadएटीएस