शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आज ठरणार नक्षलविरोधी अ‍ॅक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:21 IST

तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकांदरम्यान नक्षलवाद्यांकडून कोणताही उपद्रव होऊ नये, यासाठी चार राज्यातील पोलीस अधिकारी बुधवारी नागपुरात मंथन करणार आहेत. सुराबर्डीच्या नक्षलविरोधी अभियान केंद्रात (एएनओ) पार पडणाऱ्या या बैठकीसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मंगळवारी रात्री नागपुरात पोहोचले. तेलंगणातील अधिकारी सकाळपर्यंत येथे पोहोचणार आहेत.

ठळक मुद्देसुराबर्डीच्या एएनओत बैठक : चार राज्यातील पोलीस अधिकारी करणार मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकांदरम्यान नक्षलवाद्यांकडून कोणताही उपद्रव होऊ नये, यासाठी चार राज्यातील पोलीस अधिकारी बुधवारी नागपुरात मंथन करणार आहेत. सुराबर्डीच्या नक्षलविरोधी अभियान केंद्रात (एएनओ) पार पडणाऱ्या या बैठकीसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मंगळवारी रात्री नागपुरात पोहोचले. तेलंगणातील अधिकारी सकाळपर्यंत येथे पोहोचणार आहेत.तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही तिन्ही राज्ये महाराष्ट्राच्या गडचिरोली- गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत आहेत. या तिन्ही राज्यात नक्षलवाद तीव्र आहे. तेथे नक्षलवादी नेहमीच मोठमोठ्या घातपाती घटना घडवितात.विशेष म्हणजे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलप्रभावित भागात हिंसक कारवायांचे प्रमाण अचानक वाढते. उपरोक्त राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांत नक्षलवादी मोठा घातपात घडविण्याचे संकेत आहेत. तसा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून मिळाला आहे. ते लक्षात घेता नक्षलवाद्यांचा उपद्रव रोखून त्यांची कोंडी करण्यासाठी प्रभावी व्यूहरचना करण्याचे निर्देश केंद्रातून जारी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपुरात सुराबर्डीच्या एएनओ केंद्रात बुधवारी, २४ आॅक्टोबरला एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अशा चार राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार असून, निवडणुकीच्या तोंडावर अथवा निवडणुकीच्या दरम्यान नक्षल्यांचे कटकारस्थान कसे उधळायचे, त्यासंबंधीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानाच्या पोलीस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी मंगळवारी रात्री नागपुरात दाखल झाले. राज्याच्या एएनओचे महासंचालक डी. कनकरत्नम तसेच पोलीस महानिरीक्षक संजय सक्सेना यांनी शनिवारी एएनओला भेट दिली आहे.सुरक्षा यंत्रणांचे लक्ष!नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी भविष्यात पोलिसांची व्यूहरचना कशी राहील, ते या बैठकीत ठरविले जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे केवळ उपरोक्त चार राज्येच नव्हे तर देशभरातील सुरक्षा यंत्रणांचे लक्ष लागलेले आहे.

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी