संघीकरण विरोधी परिषद रविवारी

By Admin | Updated: October 3, 2015 03:24 IST2015-10-03T03:24:27+5:302015-10-03T03:24:27+5:30

रिपब्लिकन परिवारतर्फे ४ आॅक्टोबर रोजी नागपुरात संघीकरण विरोधी परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Anti-Conflict Council Sunday | संघीकरण विरोधी परिषद रविवारी

संघीकरण विरोधी परिषद रविवारी

 रिपब्लिकन परिवार : सीताराम येचुरी व तिस्ता सेटलवाड येणार
नागपूर : रिपब्लिकन परिवारतर्फे ४ आॅक्टोबर रोजी नागपुरात संघीकरण विरोधी परिषद आयोजित करण्यात आली आहे.
सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघ संकुलाच्या तिसऱ्या माळ्यावरील सभागृहात दुपारी १.३० वाजता होऊ घातलेल्या या परिषदेचे उद्घाटन प्रख्यात मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खा. सीताराम येचुरी व आंबेडकरी विचारवंत प्रा. भाऊ लोखंडे उपस्थित राहतील. तर ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम हे अध्यक्षस्थानी राहतील, अशी माहिती निरंजन वासनिक, विनायक जामगडे, प्रा. रत्नाकर मेश्राम, छाया खोब्रागडे, मिलिंद फुलझेले, प्रा. राहुल मून यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Anti-Conflict Council Sunday