श्वानांना देणार अ‍ॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन

By Admin | Updated: February 3, 2015 01:02 IST2015-02-03T01:02:22+5:302015-02-03T01:02:22+5:30

मिशन रॅबिजअंतर्गत वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस व डॉग ट्रस्टच्या सहकार्याने शहरात पाच हजार मोकाट जनावरे व पाळीव कुत्र्यांना सोमवारपासून अ‍ॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन देणे सुरू करण्यात आले आहे.

Antarabies voxin to the dogs | श्वानांना देणार अ‍ॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन

श्वानांना देणार अ‍ॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन

रॅबिजमुक्त परिसर अभियानाला सुरुवात
नागपूर : मिशन रॅबिजअंतर्गत वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस व डॉग ट्रस्टच्या सहकार्याने शहरात पाच हजार मोकाट जनावरे व पाळीव कुत्र्यांना सोमवारपासून अ‍ॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन देणे सुरू करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत नागपूरच्या वेट्स फॉर अ‍ॅनिमल व इंडियन सोसायटी फॉर अ‍ॅनिमल ह्युमन वेल्फेअर यांचे सहकार्य मिळाले आहे.
महानगरपालिकेच्या हनुमाननगर झोनमधून या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे, हनुमाननगर झोनच्या सभापती सारिका नांदूरकर, नगरसेवक योगेश तिवारी, डॉ. एंडी उपस्थित होते. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०१३ मध्ये १५ दिवसांसाठी ही मोहीम राबविण्यात आली होती. या दरम्यान पाच हजार श्वानांना अ‍ॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन देण्यात आले होते. यावर्षीही रेड, ब्ल्यू, ग्रीन आणि आॅरेंज नावाची टीम तयार करण्यात आली आहे. प्रत्येक टीममध्ये कुत्री पकडणारे चार कर्मचारी, एक डॉक्टर, एक परिचारिका, एक अटेंडंट, वाहनचालकासह एकूण आठ जणांचा समावेश असणार आहे.
मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, पशुचिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. उमेश हिरुळकर, वेट्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीधर बुधे, डॉ. शशिकांत जाधव, प्रमोद कानेटकर, हनुमाननगर झोनचे झोन अधिकारी कलोडे आदी उपस्थित होते. ३ फेब्रुवारीला मेडिकल कॉलेज परिसर, राजाबाक्षा, वंजारीनगर, क्रीडा चौक, अशोक चौक परिसरातील कुत्र्यांना व्हॅक्सिनेशन करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Antarabies voxin to the dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.