सुरेंद्र गडलिंग यांच्या जामिनावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 21:11 IST2021-11-24T21:11:09+5:302021-11-24T21:11:51+5:30
Nagpur News सुरजागड हिंसाचार प्रकरणातील आरोपी कथित नक्षलसमर्थक ॲड. सुरेंद्र गडलिंग यांनी मागितलेल्या जामिनावर येत्या ८ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले.

सुरेंद्र गडलिंग यांच्या जामिनावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
नागपूर : सुरजागड हिंसाचार प्रकरणातील आरोपी कथित नक्षलसमर्थक ॲड. सुरेंद्र गडलिंग यांनी मागितलेल्या जामिनावर येत्या ८ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले.
प्रकरणावर न्यायमूर्ती महेश सोनक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमोर सुनावणी झाली. २३ डिसेंबर २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी सुरजागड लोह खदाण परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह एकूण ८० वाहने जाळली. तसेच, वाहनचालक, त्यांचे सहायक व मजुरांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांना अंगावर डिझेल टाकून जाळून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात इतर आरोपींसह गडलिंग यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गडचिरोली सत्र न्यायालयाने २३ सप्टेंबर २०१९ रोजी गडलिंग यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.