पेंचमध्ये आणखी एका वाघाचा मृत्यू
By Admin | Updated: February 14, 2017 16:19 IST2017-02-14T16:19:21+5:302017-02-14T16:19:21+5:30
पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा वन परिक्षेत्रात आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली

पेंचमध्ये आणखी एका वाघाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा वन परिक्षेत्रात आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी वन कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना त्यांना वाघाचा मृतदेह आढळून आला.
विशेष म्हणजे, मागील महिन्यात पेंचमधील ही दुसरी घटना आहे. जानेवारी महिन्यात येथील एका वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.
याशिवाय नागपूर वन विभागातील घटनांचा विचार करता मागील दोन महिन्यात वाघाच्या मृत्यूची ही चौथी घटना आहे. यापूर्वी खापा आणि पवनी वनपरिक्षेत्रात दोन वाघांचा मृत्यू झाला आहे.
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वाघांच्या या मृत्यू सत्रावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.