नागपुरात आणखी एका मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 07:50 PM2018-03-19T19:50:13+5:302018-03-19T19:50:33+5:30

ओळखीच्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडली.

Another girl raped in Nagpur | नागपुरात आणखी एका मुलीवर बलात्कार

नागपुरात आणखी एका मुलीवर बलात्कार

Next
ठळक मुद्देतीन दिवसातील लागोपाठ तिसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओळखीच्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडली. अक्षय मेश्राम (वय २२) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलगी (वय १५) प्रतापनगरात राहते. नेहमीप्रमाणे ती रविवारी सायंकाळी गार्डनमध्ये खेळायला गेली होती. खेळणे झाल्यानंतर ती रात्री ७.३० च्या सुमारास आपल्या घराकडे निघाली. वाटेत आरोपी अक्षय मेश्रामचे घर आहे. तो ओळखीचा असल्याने तिने त्याला पिण्यासाठी पाणी मागितले. आरोपीने पाणी देण्याच्या बहाण्याने तिला घरात बोलविले आणि तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी दिली. मुलीने घरी परतल्यानंतर पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी मेश्रामची चौकशी सुरू आहे.
नागपुरातील बलात्काराची तीन दिवसातील लागोपाठ ही तिसरी घटना होय. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. बालाघाट येथील मुलीवर यशोदरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर एमआयडीसी भागात सामूहिक बलात्काराची दुसरी घटना घडली. आता राणाप्रतापनगर भागात घडलेली ही तिसरी घटना होय.

Web Title: Another girl raped in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.