‘गोल्ड गँग’वर आणखी एक एफआयआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:08 IST2021-03-31T04:08:54+5:302021-03-31T04:08:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नकली सोन्याचे दागिने देऊन फसवणूक करणाऱ्या महिलांच्या गोल्डन गँगने हिंगणा येथील एका सराफा व्यापाऱ्याला ...

‘गोल्ड गँग’वर आणखी एक एफआयआर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नकली सोन्याचे दागिने देऊन फसवणूक करणाऱ्या महिलांच्या गोल्डन गँगने हिंगणा येथील एका सराफा व्यापाऱ्याला १.२३ लाख रुपयाने फसवले आहे. वानाडोंगरी येथील रहिवासी हरिभाऊ रसाड यांचे हिंगणा येथील बाजार चौकात रसाड ज्वेलर्स आहे. २५ मार्च रोजी सकाळी ईशानी पांडे नामक ४० वर्षीय महिला रसाड यांच्या ज्वेलर्समध्ये आली. तिने ज्वेलर्समधील सेल्सगर्ल ज्योतीच्या हातून दागिन्यांची खरेदी केली. त्यानंतर पेमेंटऐवजी नकली सोन्याचे दागिने दिले. हॉलमार्क असल्याने ज्योतीला ही फसवणूक होत असल्याचा संशय आला नाही. नंतर मात्र महिलेने दिलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. रसाड यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. महिलांच्या अशाच प्रकारच्या टोळीने यापूर्वी गणेशपेठ येथील उदापुरे ज्वेलर्स व बडकस चौकातील भैयाजी रोकडे ज्वेलर्सचीही फसवणूक केली आहे. उदापुरे ज्वेलर्समध्ये तर एक आरोपी रंगेहाथ पकडण्यात आला होता. रोकडे ज्वेलर्समधील अशा प्रकारच्या प्रकरणावर कोतवाली पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही.