शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आणखी एक धक्का; आदिवासी नेते नामदेव उसेंडी यांचा भाजपमध्ये प्रवेश

By योगेश पांडे | Updated: March 26, 2024 21:15 IST

मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे.

नागपूर : उमरेडचे आमदार राजू पारवे यांच्यानंतर कॉंग्रेसला विदर्भात आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मंगळवारी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत आदिवासी काँग्रेसच्या २२ जिल्ह्यांतील अध्यक्षांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा त्यांनी दावा केला.

मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. गडचिरोलीतील स्थानिक उमेदवार म्हणून कॉंग्रेसकडे तिकीट मागितले होते. मात्र स्थानिक व राज्य पातळीवरील कॉंग्रेस नेतृत्वाने षडयंत्र करून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली. कॉंग्रेसमध्ये आदिवासी समाजाचे ऐकले जात नाही. त्यामुळे मी पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. भाजप सत्तेत असून जिल्हाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे डॉ.उसेंडी यांनी सांगितले. कुठलीही उमेदवारी किंवा पदाची आकांक्षा घेऊन भाजपमध्ये आलेलो नाही असा दावादेखील डॉ.उसेंडी यांनी केला.

काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये येत आहेत आणि येत राहतील. उसेंडी यांना भाजपमध्ये पूर्ण सन्मान मिळेल काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच ओबीसी व आदिवासी समाजाचा अपमान करतात. ते कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.आम्ही संन्यासी नाही, सर्वांचेच स्वागत करूअन्य पक्षांच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे यांना विचारणा केली असता आम्ही संन्यासी नाही असे त्यांनी वक्तव्य केले. उसेंडी हे एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. पक्षात कोणी आले तर त्यांचे आम्ही स्वागतच करू. आम्ही संन्यासी नाही, देशाच्या विकासासाठी राजकारण करत आहोत असे ते म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते बाहेरच्या नेत्यांच्या येण्याने नाराज असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपमध्ये कोणताही कार्यकर्ता नाराज नाही. पक्षात सर्वांना सन्मान व सोबत घेऊन चालण्याची भावना आहे असे ते म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे कॉंग्रेस नेते पक्ष सोडत आहेत. पटोले यांनी अशोक चव्हाण, राजू पारवे, डॉ. उसेंडी यांचा आदर केला असता तर त्यांनी काँग्रेस सोडली नसती, असा चिमटा त्यांनी काढला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूरBJPभाजपा