शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

'समृद्धी'वर आणखी एक अपघात; गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 12:48 IST

समृद्धीवर २ दिवसात २ अपघात

सुरभी शिरपूरकर

नागपूर : या दृश्यांमध्ये तुम्ही एक अपघात बघताय एक ट्रक दिसतोय आणि त्याच्या अगदीच बाजूला खाली पडलेले सिलिंडर दिसतायेत. हा अपघात घडला आहे समृद्धी महामार्गावर.. आता नेमकं घडलं काय ते ऐका, गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक नागपूर ते शिर्डीच्या दिशेने निघाला होता. महामार्गावरील भव्य असे रस्ते पाहून ट्रक चालकाचाही मोह आवरला नाही. दरम्यान, वाऱ्याच्या वेगाने ट्रक चालविताना त्याचं अचानक वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि पाहता पाहता ट्रक रस्त्याच्या कडेला खाली जाऊन उलटला.

 बुलढाणाजवळील मेहकर बेलगाव येथील डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही दुर्घटना आहे. गॅस सिलिंडरने भरलेला हा ट्रक होता त्यामुळे ट्रक पालटल्यावर कुठलीही मोठी दुर्घटना होऊ शकली असती, सिलिंडरचा स्फोट होऊ शकला असता आणि त्यात मोठ नुकसान  होऊ शकलं असतं. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि या अपघातात  कुठलीही जीवितहानी झाली नाही.

अपघातांची मालिका

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच २४ तासांच्या आत महामार्गाच्या पहिल्या टोल नाक्यावर पहिला अपघात झाला ज्यात एका मर्सिडीज ला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेला २४ तास होत नाहीत तोच बुलढाण्यातील ही दुसरी घटना घडलीये.

वाहने चालवा जरा जपून

समृद्धी महामार्गाचे रस्ते पाहून वाहने सुसाट वेगाने चालविल्या जात आहेत. मात्र यामुळे चालकाचे वाहनाच्या स्पीडवरील कंट्रोल सुटतंय आणि त्यामुळे या महामार्गावर अपघातांना सुरुवात झाली आहे. अशातच प्रत्येक चालकाने सावधानीपूर्वक आणि वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवूनच वाहन चालविण्याचे आवाहन लोकमतने केलयं.

टॅग्स :AccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गCylinderगॅस सिलेंडर