मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना सानुग्रह सहाय्य देण्याबाबत कार्यपद्धती घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:09 IST2021-05-27T04:09:21+5:302021-05-27T04:09:21+5:30

कोरोना महामारीच्या भीषण संकटावर मात करण्यासाठी शासनाने व प्रशासनाने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित केल्या. शिक्षक व ...

Announce procedures for providing sanugrah assistance to the families of deceased teachers | मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना सानुग्रह सहाय्य देण्याबाबत कार्यपद्धती घोषित करा

मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना सानुग्रह सहाय्य देण्याबाबत कार्यपद्धती घोषित करा

कोरोना महामारीच्या भीषण संकटावर मात करण्यासाठी शासनाने व प्रशासनाने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित केल्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या व कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली. सेवा देताना काही शिक्षक पॉझिटिव्ह झाले, काहींचा मृत्यूही झाला. मृत झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य देण्याच्या प्रक्रियेबाबत विभागच अनभिज्ञ आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रस्ताव नेमके कुठे पाठवावे, त्याचा पाठपुरावा कुठे करावा, याबाबत स्थानिक शिक्षणाधिकारीच संभ्रमात आहेत. त्यामुळे मृत शिक्षकांचे कुटुंबीय सानुग्रह अनुदानापासून वंचित आहेत. कोरोनामुळे मृत पावलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य रक्कम देण्याबाबतची कार्यपद्धती घोषित करावी व तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गाणार यांनी केली आहे.

Web Title: Announce procedures for providing sanugrah assistance to the families of deceased teachers