शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

झाडे कापण्याची माहिती वेबसाईटवर जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 10:14 IST

झाडे कापण्याची परवानगी मिळण्यासाठी सादर करण्यात आलेले अर्ज व झाडे कापण्याची परवानगी देणारे निर्णय महापालिकेच्या वेबसाईटवरून जाहीर करण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा मनपाला आदेश शासन निर्णयानुसार बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाडे कापण्याची परवानगी मिळण्यासाठी सादर करण्यात आलेले अर्ज व झाडे कापण्याची परवानगी देणारे निर्णय महापालिकेच्या वेबसाईटवरून जाहीर करण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिला.विविध विकासकामांसाठी व अन्य अनेक कारणांनी शहरातील हजारो झाडे दरवर्षी तोडली जात आहेत. उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेऊन याविषयी स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. ती याचिका न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली होती. दरम्यान, ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’ उपक्रमाचे संयोजक सुनील मिश्रा यांनी २०१६ मधील शासन निर्णयाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले व त्या निर्णयानुसार झाडे कापण्याची परवानगी मिळण्यासाठी सादर करण्यात आलेले अर्ज व झाडे कापण्याची परवानगी देणारे निर्णय वेबसाईटवरून जाहीर करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने महापालिकेला या निर्णयावर अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला.या प्रकरणात अ‍ॅड. कल्याणी देशपांडे न्यायालय मित्र असून मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

ऑरेंज स्ट्रीटवरील झाडे धोक्यातसिमेंट रोड बांधकामामुळे ऑरेंज स्ट्रीट (जयताळा ते वर्धा रोड)वरील शेकडो झाडे धोक्यात आली आहेत. ती झाडे वाचविण्यासाठी भाऊसाहेब सुर्वेनगर येथील उल्हास दाते यांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. महापालिका व सिमेंट रोड कंत्राटदार मनमानीपणे कार्य करीत आहेत. त्यांनी रोडवरील झाडे वाचविण्यासाठी काहीच नियोजन केले नाही. त्यामुळे रोडवरील झाडे तोडली जात आहेत. ती झाडे वाचविण्यासाठी तातडीने आदेश जारी करणे आवश्यक आहे असे दाते यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने शुक्रवारी महापालिकेला हे मुद्दे विचारात घेऊन आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. अर्जदारातर्फे अ‍ॅड. अनिल ढवस यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय