शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त मृत/जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा; शिवसेना आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:02 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.

ठळक मुद्देआठ दिवसात बैठकीचे सरकारचे आश्वासन

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने या अपघातांची जबाबदारी घेऊन अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याबाबत शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी लक्षवेधी उपस्थित केली. चंद्र्रकांत पाटील यांच्याकडून हा महामार्ग जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत असले तरी या डेडलाईनवर विश्वास नाही. यामध्ये झालेल्या अपघातांत ६५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना सरकार नुकसान भरपाई देणार का, असा सवाल भोईर यांनी केला.सार्वजनिक बांधकाम खात्याने १६-१७ सालची दिलेली मुदत संपली आता २०१८ ची डेडलाईन दिली जात आहे. या डेडलाईनमध्ये कामे होतील का? इंदापूर-पळस्पेपर्यंत कितीतरी अपूर्ण कामं आहेत. अजूनही वडखळ ते इंदापूर काम झालेले नाही. अशा सुप्रीम कंत्राटदारालाच ५४० कोटींची मदत दिली जाते, त्याने काय काम केले ते सांगा? या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका? जे काम पाच वर्षांत करू शकले नाहीत ते काम कसे पूर्ण होणार, असा सवाल भरत गोगावले यांनी केला.पनवेलपासून इंदापूरपर्यंत ८४ किमीचा रस्ता आहे. येथील कंत्राटदार जर नादार झाला असेल तर त्याच्याकडून कंत्राट काढून घ्यायला हवे. यासाठी सरकारने हायकोर्टात जाऊन खटला भरायला हवा. पण कंत्राटदाराला पाठीशी घातले जातेय. आणखी किती जीवांशी खेळणार, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केला. कोकणात आमची गावे असल्याने आम्ही आमदार तिथे जातो तेव्हा तिथले लोक आम्हाला प्रश्न करतात. रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहिल्यानंतर आम्हाला कोकणात जायला लाज वाटते, अशी खंत करतानाच गगनबावडा ते वैभववाडी या रस्त्याची परिस्थिती मृत्यूच्या खाईतून चाललोय अशी झाली असल्याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले. कोकणात जाण्यासाठी पर्याय असलेले एक्स्प्रेस वे तसेच अन्य रस्ते तरी चांगले करा, अशी मागणी त्यांनी केली.

 

 

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघात