शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: पर्यटन क्षेत्रासाठी नवीन पर्यटन धोरण जाहीर करा,‘एआयडी’ची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 4, 2024 20:08 IST

Nagpur News: असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटने (एआयडी) महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना एक औपचारिक स्मरणपत्र जारी करून महाराष्ट्राचे नवीन पर्यटन धोरण त्वरित जारी करण्याची विनंती केली आहे. नव्या धोरणाने विदर्भात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे.

- मोरेश्वर मानापुरे नागपूर - असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटने (एआयडी) महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना एक औपचारिक स्मरणपत्र जारी करून महाराष्ट्राचे नवीन पर्यटन धोरण त्वरित जारी करण्याची विनंती केली आहे. नव्या धोरणाने विदर्भात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे.

गिरीश महाजन यांनी जानेवारी-२०२४ मध्ये नागपुरात आयोजित ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ या खासदार औद्योगिक महोत्सवात पर्यटन धोरण एक महिन्यात जाहीर करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. एआयडीने मंत्र्यांना एक स्मरणपत्र पाठविल्याची माहिती एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी दिली.  घोषणेच्या विलंबामुळे विविध उद्योगांमध्ये चिंता निर्माण झाली असून, विदर्भात पर्यटनाचा विकास करण्यासाठी सर्वसमावेशक योजनेची तातडीची गरज आहे. 

कार्यक्रमादरम्यान, विदर्भातील पर्यटन सुविधा वाढविण्याच्या गरजेवर भर देत अनेक प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती. यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा समावेश होता. हॉटेलांना उद्योगाचा दर्जा देण्याची सरकारची यापूर्वीच्या घोषणेवर असूनही अंमलबजावणी झालेली नाही. नवीन धोरणामुळे हॉटेल्सना कमी वीज दर, कमी मालमत्ता कर आणि इतर फायदे मिळू शकतील. त्यामुळे उद्योजक आणि गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळेल आणि आकर्षित होईल. 

काळे म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्राचा विकास आणि वाढीसाठी उद्योजक नवीन पर्यटन धोरणाची आतुरतेने वाट पाहत आहे. हे धोरण विकासासाठी प्रेरणा देणारे ठरेल. योग्य पाठबळ आणि पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भात पर्यटन क्षेत्रात मुबलक संधी आहे. हे देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनू शकते. त्यामुळे पर्यटक आणि गुंतवणूकदार आकर्षित होऊ शकतात. शेजारील राज्ये सध्या आकर्षक योजना आणि प्रोत्साहन देत आहेत. नवीन धोरण महाराष्ट्रातील पर्यटन उद्योजकांसाठी चालना देणारी ठरेल. परंतु मंत्र्यांच्या घोषणेनंतरही धोरण जाहीर न झाल्याने या क्षेत्रातील उद्योजकांचा चिंता वाढली आहे.

टॅग्स :tourismपर्यटनnagpurनागपूर