दि धरमपेठ महिला संस्थेचा वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:08 IST2021-05-18T04:08:01+5:302021-05-18T04:08:01+5:30
नागपूर : आपला परिवार आपली संस्था हे ब्रिदवाक्य असलेल्या दि धरमपेठ महिला संस्थेने १७ मे २०२१ रोजी यशस्वी व ...

दि धरमपेठ महिला संस्थेचा वर्धापनदिन
नागपूर : आपला परिवार आपली संस्था हे ब्रिदवाक्य असलेल्या दि धरमपेठ महिला संस्थेने १७ मे २०२१ रोजी यशस्वी व विश्वासाचे २७ वर्ष पूर्ण करून २८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सभासद, खातेदार व हितचिंतकांच्या सहकार्य व आशीर्वादाने २०१५ कोटींचा व्यवसाय पूर्ण केला आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या अध्यक्षांनी सर्व सभासद, खातेधारक व शुभचिंतकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व शाखा व्यवस्थापकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून त्यांना कोविड-१९ मध्ये संस्थेच्या ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सुविधा देण्याचे व त्यांना पुन्हा शाखा स्तरावर मदत करता येईल का याबाबत मार्गदर्शन केले. कोविडच्या काळात कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा सुरू ठेवल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या मुख्य कार्यालयात कर्मचारी प्रतिनिधी अर्चना दामके यांच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष नीलिमा बावणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेचे प्रमुख सल्लागार यांचे सुद्धा कर्मचारी प्रतिनिधी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख सल्लागार यांनी संस्थेचे हितचिंतक, खातेदार यांना कोणताही व्यवहार करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
...........