शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाजी मेंडजोगे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:15 IST

शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे सहकार महर्षी मनोहर नरहर उपाख्य अण्णाजी मेंडजोगे यांचे १५ मार्चला निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात तीन मुली व मुलगा आहे. अंत्ययात्रा १६ मार्चला सकाळी ९.३० वाजता संती रोड, इतवारी हायस्कूल या त्यांच्या निवासस्थानावरून निघून गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएका सहकार तपस्वीचा अंत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे सहकार महर्षी मनोहर नरहर उपाख्य अण्णाजी मेंडजोगे यांचे १५ मार्चला निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात तीन मुली व मुलगा आहे. अंत्ययात्रा १६ मार्चला सकाळी ९.३० वाजता संती रोड, इतवारी हायस्कूल या त्यांच्या निवासस्थानावरून निघून गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.अण्णाजी मेंडजोगे यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी हिंगणा येथे झाला. शिक्षणासाठी ते नागपुरात आले व येथेच स्थायिक झाले. प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी १९५१ पासून शिक्षकी पेशा पत्करला व आजीवन विद्यादानाचे कार्य केले. त्यांनी शिक्षक परिषदेची स्थापना केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी भारतीय जनसंघाचेसुद्धा अनेक वर्ष कार्य केले. त्यांचे सहकार क्षेत्रात भरीव योगदान होते. सहकार हा त्यांचा आवडता विषय होता. १९७५ साली शिक्षक सहकारी बँकेची स्थापना केली. त्यांचे बँकेतील व्यवहारांवर व रिझर्व्ह बँकेच्या धोरणांवर बारीक लक्ष होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले.माझ्या जीवनावर त्यांच्या कर्तबगारीचा प्रभाव होता. आपुलकीने विचारपूस करणारा व पुत्रवत प्रेम करणाऱ्या सच्चा मार्गदर्शकाला आम्ही मुकलो आहे. शिक्षक सहकारी बँकेच्या वाढीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. आमचे आदर्श आमच्यातून निघून गेले, अशा शब्दात भावना व्यक्त करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना अभिवादन केले.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर