अण्णाभाऊंचे चरित्र व साहित्य खंडरुपाने प्रकाशित व्हावे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:28+5:302021-07-19T04:06:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी विविध संघटनांतर्फे दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या ...

अण्णाभाऊंचे चरित्र व साहित्य खंडरुपाने प्रकाशित व्हावे ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी विविध संघटनांतर्फे दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र ,साहित्य आणि उर्वरीत साहित्य खंड रूपाने प्रकाशित करून त्यांच्या जयंती दिनी ते उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.
लहू सेना
लहू सेनातर्फे दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानंतर मातंग समाजाच्या विविध मागण्या करीता निदर्शने करण्यात आली. बंद पडलेले अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला १ हजार कोटी रुपयांचा निधी देऊन महामंडळ त्वरित सुरू करण्यात यावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र ,साहित्य आणि उर्वरित साहित्य खंड रूपाने प्रकाशित करून त्यांच्या जयंती दिनी उपलब्ध करून द्यावे, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे,बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग संस्था निर्माण करण्यात यावे, क्रांतिविर लहूजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी ताबडतोब करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
संजय कठाळे आणि दिलीप वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात रुपराव सनेश्वर, सुरेश कावळे ,दिनेश वानखेडे, प्रभाकर खंडाळे, अशोक खडसे, प्रकाश वानखेडे, सुशील बावने ,राजू सोरगिले, दिलीप तायवाडे, आकाश सुरकार, देवेंद्र बावने, सुनील लोखडे , दिलीप गायकवाड, विलास उबाळे, जितेंन्द गायकवाड ,किरण सनेश्वर, हर्ष काळे , अजय बावने, रवींद्र खडसे, जानराव अंबोरे,चेतन आवारी ,सुरेश वानखेडे उपस्थित होते.
बहुजन समाज पार्टी
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या स्मृतिप्रीत्यर्थ बहुजन समाज पार्टीने दीक्षाभूमी चौकातील अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नागोराव जयकर, उत्तम शेवडे, नितीन शिंगाडे, संदीप मेश्राम, सुनंदा नितनवरे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार सदानंद जामगडे, शशिकांत मेश्राम, प्रवीण पाटील, नितीन वंजारी, मनोज निकाळजे, चंद्रशेखर कांबळे, आशिष फुललेले, सुरेंद्र डोंगरे, ओपूल तामगाडगे, प्रीतम खडतकर, अभिलेश वाहने, बुद्धम् राऊत, संगीत इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आणभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले.याावेळी कपिल लिंगायत, अजय चव्हाण,तुषार चिकाटे, विपीन गाडगीलवार,दिलीप पाटील,भीमराव कळमकर,नीरज पराडकर,पीयूष हलमारे,कुशीनारा शोमकुवर,अक्षय नानवटकर,सागर भाऊर्जार, नरेंद्र ढवळे, शहाबुद्दीन काझी,महिंद्र पावडे,बापू भोंगाडे आदी उपस्थित होते.