अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सोहळा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:58 IST2021-02-05T04:58:26+5:302021-02-05T04:58:26+5:30
नागपूर : लहू सेनेच्या वतीने शिक्षक सहकारी बँक सभागृहात रविवारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सोहळा साजरा
नागपूर : लहू सेनेच्या वतीने शिक्षक सहकारी बँक सभागृहात रविवारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर व्यासपीठावर महापौर दयाशंकर तिवारी, माजी आ. अनिल सोले, लहू सेनेचे अध्यक्ष संजय कठाळे, रवी खडसे, किशोर तेलंग, जावेद पठाण यांचीदेखील उपस्थिती होती. याप्रसंगी ‘लोकमत’चे वरिष्ठ वार्ताहर नरेश डोंगरे यांच्यासह अशोक भावे, सुनील वाघमारे, रवींद्र खडसे, डॉ. सुधाकर शिंदे, अशोक कांबळे, चंद्रकांत वानखेडे, दादासाहेब क्षीरसागर, अरविंद डोंगरे, किशोर तेलंग, विलास कठाळे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नेहा जोशी यांनी केले. प्रास्ताविक संजय कठाळे यांनी केले.