उपराजधानीतून अनिर्बन मुखर्जीचा ‘अव्वल नंबर’

By Admin | Updated: May 22, 2014 02:12 IST2014-05-22T02:12:55+5:302014-05-22T02:12:55+5:30

‘आयसीएसई’तर्फे ( इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन) आयोजित

Anirban Mukherjee's 'Top Number' by Deputy Chief Minister | उपराजधानीतून अनिर्बन मुखर्जीचा ‘अव्वल नंबर’

उपराजधानीतून अनिर्बन मुखर्जीचा ‘अव्वल नंबर’

नागपूर : आयसीएसईतर्फे ( इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन) आयोजित करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत चंदादेवी सराफ स्कूलच्या अनिर्बन मुखर्जी याने उपराजधानीतून प्रथम स्थान पटकावले. त्याला ९४ टक्के गुण मिळाले. आयसीएसईची दहावीची परीक्षा २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान देशातील ४ विभागीय मंडळासह परदेशातील एका विभागीय मंडळाकडून घेण्यात आली होती. या परीक्षेचा एकूण निकाल ९८. २८ टक्के लागला आहे. नागपुरातील शाळांचा निकाल १00 टक्के लागल्याचा दावा करण्यात येत आहे.

 

सेव्हन्थ डे अँडव्हान्टीस्टची संजना सिंग हिने ९३.८ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक पटकाविला तर येथीलच अर्क मित्रा हा विद्यार्थी ९३.२ टक्के गुण घेत तिसर्‍या क्रमांकावर आला.

Web Title: Anirban Mukherjee's 'Top Number' by Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.