जनावरांची तस्करी पकडली, ट्रकचालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:09 IST2021-03-23T04:09:15+5:302021-03-23T04:09:15+5:30
कामठी : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर लिहिगाव शिवारात जनवारांची तस्करी करणारा ट्रक नवीन कामठी पोलिसांनी पकडला. सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या ...

जनावरांची तस्करी पकडली, ट्रकचालकास अटक
कामठी : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर लिहिगाव शिवारात जनवारांची तस्करी करणारा ट्रक नवीन कामठी पोलिसांनी पकडला. सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज अब्दुल खलीद शेख (२९, रा. गोधनी) याने ट्रक क्रमांक ४२ सी.डी. ०१३१ मध्ये शिवनी (मध्यप्रदेश) येथून ३५ जनावरे अमरावती येथील कत्तलखान्यात घेऊन जात होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लिहिगाव परिसरात नाकाबंदी करून हा ट्रक पकडला. ट्रकची चौकशी केली असता, ३५ जनावरे पाय बांधून कोंबलेल्या स्थिती आढळली. पोलिसांनी जनावरे भरलेला ट्रक नवीन कामठी पोलीस ठाण्यात आणली. ही ३५ जनावरे नागपूर येथील गोसेवा समिती गोरक्षणायलयात सुरक्षित ठेवली. यासोबतच ट्रकचालक फिरोज अब्दुल खलीद शेख याच्या विरोधात कलम ११ (१) ( ड) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. जनावरे व ट्रकची किंमत एकूण १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील कारवाई नवीन कामठीचे ठाणेदार संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनात दुयम पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, मंगेश यादव, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता यांच्या पथकाने केली.