सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी प्राण्यांवर अत्याचार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST2021-04-30T04:11:29+5:302021-04-30T04:11:29+5:30
घटना १ : काही मुलांनी श्वानाच्या गळ्याला फास लावून आत्महत्या करण्यासारखा व्हिडीओ तयार केला व सोशल मीडियावर अपलोड केला. ...

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी प्राण्यांवर अत्याचार ()
घटना १ : काही मुलांनी श्वानाच्या गळ्याला फास लावून आत्महत्या करण्यासारखा व्हिडीओ तयार केला व सोशल मीडियावर अपलोड केला. ते श्वान मृत्यू पावण्याचीही शक्यता आहे. तक्रारीनंतर व्हिडीओ डिलीट केला, पण अज्ञात वापरकर्त्याने कमेंट करणाऱ्यांना धन्यवादचे रिप्लाय जरूर दिले.
घटना २ : दुसऱ्या एका घटनेत श्वानाला काठीने मारून, त्याच्या कानात काठी घालून त्याच्या किंचाळण्याचा व्हिडीओ तयार करून इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला. कमेंट व लाईक्स मिळविण्यासाठी हा क्रूर प्रयत्न होता.
घटना ३ : काही तरुणांनी घरातील श्वानाचे कान पिरगाळून त्याच्या विव्हळण्याचा व्हिडीओ अपलोड केला.
नागपूर : सोशल मीडियावर सुरू असलेला हा किळसवाणा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषत: कोरोना महामारीनंतर सोशल मीडियावर असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. धक्कादायक म्हणजे, यामध्ये लहान मुलांचा सहभाग भीती निर्माण करणारा आहे.
नागपूरच्या प्राणिप्रेमी व सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या प्रमुख स्मिता मिरे यांनी याबाबत सदर पोलीस स्टेशन आणि सायबर सेलकडे तक्रार केली. सायबर सेल पोलिसांनी पहिल्या व्हिडीओमधील दोन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत काही मानसिक आजारी अशाप्रकारचे व्हिडीओ बनवून आसुरी आनंद घेत आहेत.
स्मिता मिरे यांनी सांगितले, एक दाेन नव्हे, तर अशा व्हिडीओंचा पूर आल्यासारखे चित्र आहे आणि यामध्ये १२-१४ वर्षे वयापासूनच्या बालकांचा सहभाग चिंताजनक आहे. काेराेना प्रकाेपामुळे शाळा बंद झाल्या आणि शिक्षण ऑनलाईन झाले. शैक्षणिक दृष्टीने चांगले असले तरी त्याचा गैरवापरही वाढला आहे. मुलांच्या हातात माेबाईल व इंटरनेटचे काेलित मिळाले आहे. आपला पाल्य साेशल मीडियावर काय करताे, याकडे पालकांचे लक्ष राहत नसल्याने एक तर अश्लीलता पाहणे किंवा प्राण्यांशी अशाप्रकारे खेळण्याचा प्रकार वाढला आहे. मग साेशल मीडियावर लाईक्स व कमेंट्स मिळविण्यासाठी श्वान, त्यांची पिल्ले किंवा इतर प्राण्यांना लक्ष्य केले जात असल्याचे स्मिताने सांगितले. सायबर सेलने व्हिडीओ बनविणाऱ्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नागरिकांनाही पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
- हा गंभीर गुन्हा
प्राणी अत्याचार नियंत्रण कायदा १९६० च्या कलम ११(आय)(ए)(I) सह आयपीसीच्या कलम ४२८ व ४२९ तसेच आयटी ॲक्टच्या कलम ६६ डी अंतर्गत अशाप्रकारे प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली जाऊ शकते. या व्हिडीओवरून पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे स्मिता यांनी सांगितले. मात्र, पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
फेक अकाउंटवरून क्रूरतेचा प्रकार
स्मिता यांनी सांगितले की, अनेक तरुण साेशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करतात आणि अशा प्रकारचे व्हिडीओ अपलाेड करतात. लाईक्स व कमेंटच्या व प्रसिद्धीच्या हव्यासापाेटी असा प्रकार केला जात आहे.