शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशी बियाण्यांसोबत पशुसंवर्धनही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : म्युर मेमोरियल रुग्णालयाच्या परिसरात सुरू असलेल्या बीजोत्सवात देशी बियाण्यांच्या संवर्धनासोबतच यंदा देशी पशुसंवर्धनाचाही संदेश देण्यात आलेला आहे. यासाठी पारंपरिक पशुपालन करणाऱ्या पिढीची नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने त्यांनाही यंदा हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. बीजोत्सवातील या प्रदर्शनात वर्धेतील प्रसिद्ध गौळाऊ गाय, नागपुरी म्हैस, गुजरातची ...

ठळक मुद्देबीजोत्सव : पारंपरिक पशुपालकांनाही मिळाले हक्काचे व्यासपीठ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : म्युर मेमोरियल रुग्णालयाच्या परिसरात सुरू असलेल्या बीजोत्सवात देशी बियाण्यांच्या संवर्धनासोबतच यंदा देशी पशुसंवर्धनाचाही संदेश देण्यात आलेला आहे. यासाठी पारंपरिक पशुपालन करणाऱ्या पिढीची नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने त्यांनाही यंदा हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. बीजोत्सवातील या प्रदर्शनात वर्धेतील प्रसिद्ध गौळाऊ गाय, नागपुरी म्हैस, गुजरातची देशी गीर आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.देशी बियाण्यांचा वापर वाढावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या बीजोत्सवाचे हे ६ वे वर्ष आहे. यंदा एक पायरी पुढे जाऊन पारंपरिक पशुपालन करणाºया समाजालाही यात सामील करण्यात आले आहे. आपल्या देशात पशुपालन करणारे काही ठराविक समाज आहे. ते केवळ दूधासाठीच पशुपालन करत नाहीत तर पशुपालन ही त्यांची संस्कृती आहे. पशुपालनातून ते दूध, शेती व खत निर्माण करीत असतात. उदाहरणार्थ नंदागवळी समाज हा गौळाऊ गाईंचे पालन करतो. गुजरातचे भारवाड समाज हे देशी गीर गाईंचे पालन करतात. रबारी समाज काँग्रेज गाय, माना, धनगर आदिवासी समाज हे शेळी मेंढी पालन करतात. पारंपरिक पद्धतीने हा समाज पशुपालन करीत आला आहे. पशुपालन ही त्यांची संस्कृती आहे. त्यामुळे शेती आणि अन्नधान्य सुरक्षिततेमध्ये या समाजाचा मोठा वाटा राहिलेला आहे. शहरातील नागरिकांना याची माहिती व्हावी, या उद्देशाने बीजोत्सवात या समाजातील काही नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रदर्शनात या पारंपरिक देशी पशुंचा एक स्वतंत्र स्टॉल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यात गौळाऊ गाय, नागपुरी म्हैस, देशी गीर, शेळी यांच्यासह उंटही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.गौळाऊ गाय ही अतिशय प्रसिद्ध आहे. तिला ‘विदर्भाची शान व वर्धेची माय’ असेही म्हटले जाते. ही गाय मुख्यत: आर्वी, आष्टी व कारंजा या भागात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. गौळाऊ गाईपासून तयार होणाºया तुपाला प्रचंड मागणी आहे. या गाईचे दूध ए-२ आहे. आयुर्वेदात याला मोठी मागणी आहे. लोमेश्वर आसोले हे स्वत: गौळाऊ गाईचे तूप काढतात. हा शुद्ध तुपाचा स्टॉलही बीजोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. यासोबतच आम्ही आमच्या आरोग्यासाठी, लाल अंबाडीचे सरबत आदींचेही स्टॉल लक्ष वेधून घेत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर